आमदार मिणचेकर हे मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला भेट देण्यासाठी गेले होते. त्यावेळी आंदोलक महिलांनी आक्रमक पवित्रा घेत सुजित मिणचेकर यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
इतकंच नाही तर, आरक्षण देता येत नसेल तर बांगड्या भरा, अशी आगपाखडही त्यांच्यावर करण्यात आली.
जे आमदार, राज्यकर्ते निष्क्रिय आहेत, त्यांना आम्ही बांगड्यांचा आहेर पाठवतो, बांगड्या भरा आणि घरात बसा, असं महिलांनी ठणकावलं.
आरक्षणासाठी आमदार-खासदारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राज्यभरातून केली जात आहे. तशीच मागणी सुजित मिणचेकर यांच्याकडेही करण्यात आली. त्यावर आमदार मिणचेकरांनी तसा राजीनामा देता येत नाही, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या परवानगीनेच पुढची कारवाई करावे लागेल, अशी सारवासारव केली.
त्यावेळी आक्रमक झालेल्या महिलेने, जे आमदार निष्क्रिय आहेत, त्यांना आम्ही बांगड्यांचा आहेर पाठवतो, बांगड्या भरा आणि घरात बसा, असं ठणकावलं.