मुंबई : वस्तू आणि सेवाकर अर्थात जीएसटीसाठी आजपासून (शनिवार) राज्याचं तीन दिवसीय विशेष अधिवेशन मुंबईत होणार आहे. जीसएटी विधेयक केंद्रात मंजूर झालं असून आता राज्यात जीएसटी मंजूर करुन घेण्याचा सोपस्कार पार पाडले जाणार आहेत.
एकीकडे कर्जमाफीसाठी विरोधकांनी राज्यभर संघर्षयात्रा काढली आहे. विरोधकांसह शिवसेनाही कर्जमाफीच्या मुद्द्यावर आक्रमक झाली आहे. त्यामुळे या अधिवेशनात कर्जमाफीचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशन हे विरोधकांच्या बहिष्काराने गाजले होतं. तेव्हा हे जीएसटी अधिवेशन विरोधकांच्या आंदोलनामुळे पुन्हा एकदा गाजण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे राज्यात विधेयक मंजूर करण्याचं मोठं आव्हान फडणवीस सरकारसमोर आहे.
शिक्षण, आरोग्य, अन्नधान्यावर जीएसटी नाही!
दरम्यान, शिक्षण, आरोग्य आणि अन्नधान्यावर जीएसटी लागणार नाही. पण सिनेमा पाहण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागू शकतात. श्रीनगरमध्ये पार पडलेल्या जीएसटी परिषदेत विविध सेवांसाठी करनिश्चिती केली असून त्याची 1 जुलैपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
जीएसटी परिषदेने गुरुवारपर्यंत 1 हजार 211 वस्तू आणि सेवांची करनिश्चिती केली आहे. मात्र सोन्याच्या कराबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नसून, पुढची बैठक 3 जूनला होणार आहे.
संबंधित बातम्या
जीएसटीमुळे दूध, अन्नधान्यावर कर नाही, एसी-फ्रीजही स्वस्त होणार
जीएसटीसाठी विशेष अधिवेशन, शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष
GST विधेयक अधिवेशन 20, 21, 22 मे रोजी!
राज्यात जीएसटीचा मार्ग मोकळा, मंत्रिमंडळाची मंजुरी
जीएसटीचा मार्ग मोकळा, विधेयकाला राज्यसभेतही मंजुरी
GST संदर्भातील चारही विधेयकं लोकसभेत मंजूर