कोयना धरण परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के
एबीपी माझा वेब टीम | 19 May 2017 11:50 PM (IST)
फाईल फोटो
सातारा : कोयना धरण परिसरात रात्री 11 वाजण्याच्य सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. यात जीवितहानीचं वृत्त नसून, परिसरात भीतीचं वातावरण होतं. आज रात्री 10.56 वाजण्याच्या सुमारास कोयना धरण परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाचे धक्के कोयना धरण परिसरासोबतच चिपळूण आणि संगमेश्वरच्या काही भागातही जाणवले. या भूकंपाने कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नसली, तर भूकंपामुळे परिसरात भीतीचं वातावरण होतं.