मुंबई: शुक्रवारी विधानसभा आणि विधानपरिषदेच्या सदस्यांकरिता 'मैं अटल हूँ' (Main Atal Hoon) चित्रपटाचे स्क्रीनिंगच विशेष आयोजन करण्यात आलं आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या (Rahul Narwekar) पुढाकाराने संध्याकाळी 6 वाजता या चित्रपटाचे आयोजन करण्यात आलं आहे. 


देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित असलेला 'मैं अटल हूँ' हा चित्रपटा शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. त्याचे औचित्य साधून विधानसभा आणि विधानपरिषद आमदारांसाठी 'मैं अटल हूँ'च्या विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात विशेष प्रयोगाचे आयोजन करण्यात आलं आहे. आमदारांसोबतच सर्व अधिकारी आणि विधीमंडळातील कर्मचाऱ्यांनाही या चित्रपटाचा लाभ घेता येणार आहे. 


रवी जाधव दिग्दर्शित 'मैं अटल हूँ' हा चित्रपट 19 जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कथा भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित आहे. 'मैं अटल हूँ' या चित्रपटात अभिनेता पंकज त्रिपाठीने अटल बिहारी वाजपेयींची भूमिका साकारली आहे. 


या घटनांचा चित्रपटात उल्लेख


'मैं अटल हूँ' हा सिनेमा 'द अनटोल्ड वाजपेयी: पॉलिटिशन अ‍ॅण्ड पॅराडॉक्स' या पुस्तकावर आधारित हा सिनेमा आहे. 'मैं अटल हूँ' या चित्रपटाच्या दुसऱ्या ट्रेलरमध्ये भारतीय इतिहासातील विविध घटना दाखवण्यात आल्या आहेत. यामध्ये महात्मा गांधींची हत्या, अटल बिहारी वाजपेयी यांचा राजकीय संघर्ष, आणीबाणी, रामजन्मभूमी, पोखरण अणुचाचणी आणि  कारगिल युद्ध या घटनांची झलक दाखवण्यात आली आहे. ट्रेलरमधील पंकज त्रिपाठी यांच्या अभिनयानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


देश पहले, हिंदू तन मन, हिंदू जीवन, रग-रग हिंदू मेरा परिचय ही मैं अटल हूं या चित्रपटातील गाणी काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आली. आता प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


ही बातमी वाचा: