विजयसिंह पाटील यांची कहाणी
उस्मानाबादेतील विजयसिंह पाटील यांची. विजयसिंहांनी आपल्या आयुष्याची २५ वर्षे राजकारणात घातली पण अखेरीस वाट्याला आली ती चहाची टपरी.
विजयसिंह पाटील 57 वर्षाचे आहे. ते 40 एकर शेतीचे मालक होते. पण दोन टर्म सरपंचकी आणि एक वेळेसच्या आमदारकीच्या निवडणूकीत लाखमोलाची 15 एकर जमिन गमावून बसलेत. पाटलांनी याआधी गावासाठी, मग नेत्यांसाठी आणि नंतर स्वतसाठी राजकारण करण्यात अनेक वर्षे घालवली. अशातच वेळेवर जाग आल्यावर 2011 पासून राजकारण सोडलं. अखेर त्यांनी टपरीवजा हाँटेलात चहा, गुलाबजामून तयार करुन विकायला सुरुवात केली. यावर्षी विजयरावांची दोन हाँटेल झालीत.
VIDEO | सत्तेच्या खुर्चीसाठी कंगाल झालेल्यांची कहाणी | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा
रामजिवन पंढरी बोंदर यांची कहाणी
रामजीवन पंढरी बोंदर हे कारगील युद्दात पराक्रम गावजलेले हवाई दलाचे सैनिक होते. 16 वर्षे सैन्यात सेवा करुन गावी आल्यावर यांना सत्तेच्या राजकारणात येण्याचा मोह झाला. त्यातूनच भाजपाच्या तिकीटांवर बोंदर यांच्या पत्नी संगिता पंचायत समिती सदस्य झाल्या. स्वत दोन वेळेस जिल्हा परिषद, दोन वेळेस ग्रामपंचायतीच्या निवडणूका लढवल्या. या प्रवासात बोंदर कुटुंबानं एक एकर शेती, वन बीएचकेचा फ्लँट, 50 तोळे सोने गमावले. अजूनही कुटुंबावर 40 लाखाच्या कर्जाचा बोजा बाकी आहे.
रामजीवन आणि विजयरावांसारख्या कित्येक जणांनी राजकारणात उडी घेतली आणि स्वतःबरोबर कुटुंबकबिल्याचंही अर्थकारण बिघडवलं. आणि या सगळ्यासाठी त्यांनी जबाबदार धरलंय ते राजकारणातल्या घराणेशाहीला प्रोत्साहन देणाऱ्या नेत्यांना. तेव्हा लोकहो निवडणुका तोंडावर आल्यात राजकारणात पाऊल टाकण्याआधी पुढचा मागचा नक्की विचार करा.