1. निवडणुकीच्या वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता वाढली,तर राहुल गांधींची घटली, 'एबीपी न्यूज'चा सर्व्हे,एअरस्ट्राईकनंतर मोदींना 55 टक्के तर राहुल गांधींना केवळ 19 टक्के पसंती


 

  1. शरद पवारांच्या मुंबईतील घरी राष्ट्रवादीच्या नेत्यांची मॅरेथॉन बैठक,निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिग्गज नेत्यांची उशिरापर्यंत खलबतं


 

  1. अहमदनगरच्या जागेवर तोडगा न निघाल्यास निर्णय घेण्यास स्वतंत्र,सुजय विखे पाटील यांचं सूचक विधान,गिरीश महाजनांच्या भेटीने भाजपप्रवेशाच्या चर्चांना उधाण


 

  1. महाराष्ट्रातील लोकसभेचे उमेदवार निश्चित करण्यासाठी काँग्रेस स्क्रिनिंग कमिटीच्या बैठका,नाना पटोले,सुशीलकुमार शिंदे,माणिकरावांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती


 

  1. मध्यस्थीच करायची होती तर राम मंदिराचा मुद्दा 25 वर्षे सुरु का ठेवला?, 'सामना'मधून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर सवाल तर मध्यस्थीवर संघही नाराज


 

  1. मुंबईतल्या 500 स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरावरील मालमत्ता कर रद्द,निवडणुकांच्या तोंडावर  मोठा निर्णय,स्वयंपुनर्विकास प्रकल्पालाही मंजुरी


 

  1. विरोधकांच्या टीकेनंतर महाधिवक्ता वेणुगोपाल यांचं घूमजाव,राफेल कराराच्या कागदपत्रांची चोरी नाही तर फोटोकॉपी,पीटीआयच्या मुलाखतीत दावा


 

  1. पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी लंडनमध्ये,रस्त्यावर मुक्तपणे वावर करतानाचा व्हिडीओ समोर


 

  1. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानींचा मुलगा आकाश आज श्लोका मेहतासोबत विवाहबंधनात,मुंबईतल्या ग्रँड वेडिंगसाठी बड्या सेलिब्रिटीजना निमंत्रण


 

  1. विराट कोहलीच्या झुंजार शतकानंतरही टीम इंडियाचा पराभव,रांचीतील तिसऱ्या वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाकडून 32 धावांनी मात