यवतमाळमध्ये एका व्यक्तीनं दारुविक्रीसाठी वेगळीच शक्कल लढवली. शंकर पवार या व्यक्तीने दारु विक्रीसाठी एक खास जॅकेट शिवल्याचं उघड झालं आहे.
या जॅकेटला एक-दोन नव्हे तर तब्बल 24 खिसे त्याने बनवून घेतले. या 24 खिशात 24 दारुच्या बाटल्या लपवल्या होत्या.

मात्र बसस्थानक परिसरात संशयितरित्या फिरणाऱ्या शंकर पवारला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी हा सर्व प्रकार उघड झाला.
या जॅकेटमध्ये दारुच्या बाटल्या भरुन नेत असताना यवतमाळ बसस्थानकात त्याला अटक करण्यात आली.
दारुची अवैध विक्री करण्यासाठी शंकरनं हे जॅकेट शिवलं होतं.