मुंबई: रेल्वेच्या अॅप्रेंटिस उमेदरावांनी मुंबईत रेल्वे रोखल्यानंतर रेल्वेकडूनही आता त्याची दखल घेण्यात आली आहे. अॅप्रेंटिस उमेदवारांसाठी वेगळी परीक्षा घेण्यात येणार आहे , असं रेल्वे बोर्डाने म्हटलं आहे.
अॅप्रेंटिस विद्यार्थ्यांसाठी 20 टक्के कोटा दिला आहे तो रद्द करा, रेल्वे जीएम कोट्यातून भरती होत होती तशी सुरु करा, रेल्वेत अडीच लाख जागा रिक्त असताना जागा भरल्या जात नाहीत त्या भरल्या जाव्यात, अशा प्रमुख मागण्या या प्रशिक्षणार्थींच्या आहेत. त्यासाठी सकाळी 7 पासून या उमेदवारांनी मुंबईच्या रेल्वेमार्गाची नाकेबंदी केली आहे.
त्यानंतर आता रेल्वेने या आंदोलकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतला आहे.
मध्य रेल्वेचं स्पष्टीकरण
अॅप्रेंटिस अक्टनुसार, अॅप्रेंटिस उमेदवारांना नोकरी देण्याचा कोणताही नियम नाही. अशा उमेदवारांना ठराविक काळात केवळ प्रशिक्षण दिलं जातं. त्यांचं कौशल्यविकास आणि कामाचा अनुभव हा त्यामागचा हेतू असतो.
तरीही रेल्वे मंत्रालयाने 20 टक्के जागा या थेट अॅप्रेंटिसमधून भरण्याचा निर्णय घेतला. याबाबतची अधिसूचनाही जारी झाली असून, अर्ज करण्यासाठी 31 मार्च 2018 ही तारीख देण्यात आली आहे.
अॅप्रेंटिस उमेदवार या अधिसूचनेनुसार अर्ज करु शकतात. त्यासाठी लवकरच विशेष/वेगळी परीक्षा घेऊ. ज्यांनी अॅप्रेंटिसशिप केली आहे, रेल्वे वर्कशॉपचं प्रशिक्षण घेतलं आहे, त्यांच्यासाठी ही परीक्षा असेल.
अॅप्रेंटिस उमेदवारांचं आंदोलन
ल्वेभरतीतील गोंधळाविरोधात अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत, मध्य रेल्वे ठप्प केली आहे. पिक अवर्सलाच म्हणजे सकाळी कामावर जाण्याच्या वेळेलाच, अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी अचानक रेल्वे बंद केल्याने, मुंबईकरांचं तुफान हाल होत आहे.
विद्यार्थ्यांनी माटुंगा ते दादर दरम्यान रेल्वे रुळावर ठिय्या मांडला आहे. त्यामुळे लोकलसह बाहेरगावी जाणाऱ्या एक्स्प्रेसही रखडल्या आहेत.
अॅप्रेंटिस विद्यार्थ्यांसाठी 20 टक्के कोटा दिला आहे तो रद्द करा, रेल्वे जीएम कोट्यातून भरती होत होती तशी सुरु करा, रेल्वेत अडीच लाख जागा रिक्त असताना जागा भरल्या जात नाहीत त्या भरल्या जाव्यात, अशा प्रमुख मागण्या या प्रशिक्षणार्थींच्या आहेत.
अॅप्रेंटिस विद्यार्थ्यांनी अनेक वर्षे काम करुनही जागा न भरल्याने हा पवित्रा घेतला आहे. महत्त्वाचं म्हणजे देशभरातील विद्यार्थी आज मुंबईत आले आहेत. त्यांनी सकाळी सकाळीच रेल्वे बंद पाडल्या.
20 टक्के कोटा रद्द करण्याची मागणी
पूर्वी रेल्वे अप्रेंटिसना थेट रेल्वेत सामावून घेतलं जायचं, पण आता त्यासाठी 20 टक्के इतका कोटा ठरवला गेलाय, शिवाय एक लेखी परीक्षाही द्यावी लागते. त्यामुळे रेल्वेतल्या संधी कमी झाल्याचा युवकांचा आरोप आहे. मागण्या मान्य न झाल्यास हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचाही इशारा यावेळी आंदोलकांनी दिला. यामध्ये अनेक मराठी तरुणांचाही समावेश आहे.
संबंधित बातम्या
LIVE लोकल ठप्प: अॅप्रेंटिस उमेदवारांची वेगळी परीक्षा घेणार
अॅप्रेंटिस उमेदवारांसाठी वेगळी परीक्षा घेणार
अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
20 Mar 2018 10:22 AM (IST)
अॅप्रेंटिस उमेदवारांसाठी वेगळी परीक्षा घेण्यात येणार आहे, असं रेल्वे बोर्डाने म्हटलं आहे.
रेल्वेभरतीतील गोंधळाविरोधात विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत, मध्य रेल्वे ठप्प केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -