SP MLA Rais Sheikh says Everyone should speak Marathi: सक्तीच्या हिंदी विरोधात चांदा ते बांदा रणकंदन सुरु असतानाच उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोकांची पोट महाराष्ट्रामध्ये भरत असतानाही तेथील नेत्यांची मस्तवालपणाची वक्तव्य समोर येत आहेत. सातत्याने महाराष्ट्र आणि मुंबईवर गरळ ओकणाऱ्या हिंदी भाषिक पट्ट्यातील नेत्यांचा मस्तवालपणा वाढत असताना समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी मात्र या नेत्यांना एक प्रकारे घरचा आहेर देत मराठीवर आपलं प्रेम व्यक्त करताना बांधिलकी सुद्धा दाखवून दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून संशय येईल, अशा पद्धतीने जहरी वक्तव्ये करून महाराष्ट्रात वाद निर्माण करणाऱ्या अबू आझमींना यांना सुद्धा रईस शेख यांनी चपराक दिली आहे.
राहुल नार्वेकर पासून रईस शेखपर्यंत सगळ्यांनी मराठी बोललं पाहिजे
रईस शेख यांनी आज एबीपी माझाशी बोलताना मराठी भाषेवरून आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की आमची आणि पक्षाची भूमिका सुद्धा स्पष्ट आहे की मराठी भाषा सगळ्यांनी शिकली पाहिजे. मात्र, ज्या प्रकारे मराठी भाषा बोला, मराठी भाषा शिका असा आग्रह करण्यात येत आहे, त्यासाठी भाषा शिकावी म्हणून कोणती सोय करण्यात आली आहे का? अशी विचारणा त्यांनी केली. ते म्हणाले की मी स्वतः दोन मराठी पेपर वाचतो, जेणेकरून माझं मराठी अधिक चांगल्या पद्धतीने होईल. राहुल नार्वेकर पासून रईस शेखपर्यंत सगळ्यांनी मराठी बोललं पाहिजे. त्यासाठी मी माझी मराठी सुधारतो. तुमच्यापेक्षा मी चांगलं मराठी बोलू शकतो असं शेख म्हणाले.
निरहूआला तुम्ही काय पब्लिसिटी देता? त्याला कोण ओळखतं?
दरम्यान ठाकरे बंधूंच्या मनोमिलनावरूनही रही शेख यांनी प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर दोन भाऊ एकत्र येत असेल तर ते आमच्या सगळ्यांना आनंददायी असल्याचे ते म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की महाराष्ट्रात आणि मुंबईत आल्यानंतर लोक मराठी नक्की शिकतील. मात्र, त्यासाठी आपल्याला सोय करावी लागेल असे त्यांनी सांगितलं. दरम्यान, भोजपुरी अभिनेत्याने आव्हानावरही त्यांनी खिल्ली उडवत ते म्हणाले की त्याला कोण ओळखतं? निरहूआला तुम्ही काय पब्लिसिटी देता? त्याला कोण ओळखतं? मनसे सोडा, शिवसेना सोडा समाजवादी पक्ष त्याला मुंबईत आल्यानंतर मराठी शिकवेल असा इशारा दिला.
इतर महत्वाच्या बातम्या