Soybean Rate : राज्यातील सोयाबीन उत्पादकांच्या दृष्टीने एक महत्वाचटी बातमी समोर येत आहे. दक्षिण आफ्रिकेतून मोठ्या प्रमाणावर सोयाबीन आयात करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. 1 लाख टन सोयाबीन मराठवाड्यात आयात करण्याचा सौदा पूर्ण झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. तयामुळं हा निर्णय राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा आहे. कारण सोयाबीन आयात केल्यामुळं राज्यातील सोयाबीनचे दर घसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याच मुद्यावकुन किसन सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
1 लाख टन सोयाबीन आयातीमुळं दर लगेच कोसळीत अशी भीती शेतकऱ्यांनी बाळगण्याची गरज नाही
सोयाबीनची आयात सुरु झाल्यानंतर राज्यातील सोयाबीनचे दर कोसळतील आणि त्याचा वााईट परिणाम सोयाबीनच्या दरावर होईल असे बोलले जात आहे. मात्र, देशात एकूण सोयाबीन निर्माण होते, त्याच्या तुलनेत 1 लाख टन सोयाबीन आयातीमुळं दर लगेच कोसळीत अशी भीती शेतकऱ्यांनी बाळगण्याची गरज नाही. बऱ्याचवेळा अशा बातम्या पसरवून शेतकऱ्यांना पॅनिंग सेलिंग करण्यासाठी प्रवृत्त केलं आहे. तसे होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी बाजाराचा अंदाज घेऊन, टप्प्या टप्प्याने सोयैाबीन बाजारात आणावे. भाव जोपर्यंत योग्. मिळत नाही, तोपर्यं शेतकऱ्यांनी संयमाची भूमिका घ्यावी, सरकारने आगामी काळात सोयाबीन आयात वाढवू नये असे डॉ. अजित नवले म्हणाले.
सोयाबीन ची लागवड मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात केली जाते
सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाच पीक आहे. सोयाबीन ची लागवड मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात केली जाते. मध्य महाराष्ट्रात सुद्धा याची बऱ्यापैकी लागवड होते. राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण या पिकावर अवलंबून आहे. आकडेवारीवर नजर टाकायची झाल्यास राज्यात देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनापैकी 40 टक्के उत्पादन घेतले जाते आणि आपले राज्य उत्पादनाच्या बाबतीत दुसऱ्या नंबरवर आहे.
सोयाबीन लवकरच मुंबई बंदरात दाखल होणार
आयातीमुळं देशातील सोयाबीन उपलब्धता वाढणार आहे आणि साहजिकच याचा परिणाम म्हणून देशातील स्थानिक बाजारात दर घसरण्याची शक्यता बळावत चालली आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान शेतकऱ्यांना हमीभाव आणि दरवाढीची आश्वासने देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात आयात वाढल्यामुळे त्या आश्वासनांवर पाणी फिरण्याची स्थिती निर्माण झाली आहे. दक्षिण आफ्रिकेतून तब्बल एक लाख टन सोयाबीन आयात करण्याचा मोठा सौदा निश्चित करण्यात आला आहे. हा माल लवकरच मुंबई बंदरात दाखल होणार असून त्याचा थेट परिणाम मराठवाड्यातील बाजारभावांवर होणार आहे. आयात सोयाबीनचा अंदाजे खर्च 4,870 रुपये प्रति क्विंटल पडत असल्याने सरकारने जाहीर केलेला 5,328 रुपये हमीभाव मिळणे कठीण होईल, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. यावर्षी अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाली. त्यात पुन्हा आयातीमुळं दर घसरले तर फटका बसण्याची शक्यता आहे.
स्थानिक उत्पादन कमी असल्याने प्रक्रिया उद्योगांना कच्च्या मालाची कमतरता भासू नये म्हणून आयातीचा मार्ग अवलंबण्यात आला असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. लातूर बाजारपेठेत पहिला मोठा आयात सौदा पूर्ण झाल्यानंतर इतर व्यापारीही आयातीला प्राधान्य देताना दिसत आहेत.