एरव्ही नोकर चाकर दिमतीला असलेल्या नेत्यांनी यावेळी मात्र आपल्या हाताने ताटं धुतलेली वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमात पाहायला मिळालं.
पदयात्रेला तुफान गर्दी
दरम्यान, भरदुपारी तीनच्या सुमारास काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या पदयात्रेला सुरुवात झाली. यावेळी मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. राहुल गांधींच्या हातत हात देण्यासाठी युवकांनी मोठी गर्दी केली.
वर्ध्यात काँग्रेसची बैठक
गांधी जयंतीच्या निमित्ताने आज वर्ध्यात काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारणीची बैठक झाली. या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग, पी. चिदंबरम यांच्यासह काँग्रेस वर्किंग कमिटीचे 53 सदस्य उपस्थितत होते. गांधीजींनी 1942 मध्ये वर्ध्यातून इंग्रजांना भारत छोडो आंदोलनाचा नारा दिला होता. त्याचाच आधार घेत काँग्रेस आज भाजप मुक्त भारतचा निर्धार करणार आहे.