उस्मानाबाद : जिल्ह्यात 64 वर्षांच्या एका वृद्धाचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. हा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह नव्हता. मात्र, त्याची पत्नीला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले होते. त्यांच्यावर परंडा उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मृताला दम्याचा आजार होता. उपचार सुरू असताना दोन दिवसांपूर्वी हा व्यक्ती मरण पावला. त्यानंतर दोन दिवस वडिलांचा मतदेह ताब्यात घ्यायला मुलाने नकार दिला. मुलाने परंडा पोलिसांत आपनं मतदेहावर अत्यंस्कार करू शकत नाही, असे लिहून दिले. आज दोन दिवस वाट पाहून उस्मानाबाद पालिकेतल्या चार कर्मचाऱ्यांनी अंत्यसंस्कार केले.
कोरोनामुळे पसरलेल्या अवास्तव भीतीमुळे निगेटिव्ह असलेल्या जन्मदात्या पित्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास पोटच्या मुलानेच नकार दिला. त्यामुळे मृत्यूनंतर दोन दिवस मृतदेह उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात पडून होता. जन्मदात्या पित्यावर अंत्यसंस्कार करण्यास असमर्थ असल्याचे मुलाने लिहून दिल्यामुळे बेवारस अशी नोंद घेत उस्मानाबाद नगरपालिकेवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. सोमवारी मयत झालेल्या परंडा तालुक्यातील उकडगाव येथील मयतावर बुधवारी दुपारी येथील कपिलधार स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
50 पोलीस क्वॉरन्टाईन, आम्हाला सहकार्य करा; पोलिसांच्या आवाहनाला सोलापूरकरांचा प्रतिसाद
नातेवाईक असताना बेवारस अशी नोंद
दमा आणि अन्य आजारामुळे रुग्णालयात दाखल असलेल्या 64 वर्षीच्या ह्या व्यक्तीला पाच दिवसांपूर्वीच कोरोनाची बाधा नसल्याचा अहवाल प्राप्त झाला. दम्याच्या आजारामुळे उपचारादरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात सोमवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर वडिलांना सुध्दा करोनाची बाधा आहे असं समजून मृतदेह ताब्यात घेण्यास पोटच्या मुलानेच नकार दिला. अन्य नातेवाइकांनीही जबाबदारी घेण्यापासून पळ काढला. चक्क दोन दिवस अंत्यविधीविना मृतदेह रुग्णालयात पडून होता. दोन दिवस मृतदेह ताब्यात घेण्यासाठी कोणीच पुढे न आल्यामुळे पोलीस पंचनामा करून बेवारस अशी नोंद घेण्यात आली.
पोटच्या मुलाची मृतदेह स्वीकारण्यास असमर्थता
परंडा येथील उकडगव येथील एका महिलेला कोरोनाची लागण झाली. तपासणीअंती तिचा अहवाल सकारात्मक असल्याचे समोर आले. तिच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. तिच्या पतीचा अहवाल मात्र नकारात्मक आल्याने तात्पुरता दिलासा मिळाला. मात्र, अन्य आजारांमुळे त्यांना उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोना नसलेल्या वृद्धाचा अन्य आजारामुळे सोमवारी मृत्यू झाला. मात्र, कोरोनाच्या अवास्तव भीतीपोटी त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईक तसेच कुटुंबातील सदस्यांनी चक्क नकार दिला. पोटच्या मुलानेच मृतदेह स्वीकारण्यास असमर्थता दाखविल्याने मृतदेह सलग दोन दिवस जिल्हा शासकीय रुग्णालयात पडून होता. बुधवारी दुपारी कायदेशीर सोपस्कार पार पाडत उस्मानाबाद पालिकेच्या वतीने मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
आपल्या वडिलांचे अंतिमसंस्कार करण्यास आपण असमर्थ असल्याचे लेखी निवेदन मुलाने परंडा पोलीस ठाण्यात दिले असल्याची माहिती आहे. त्यानुसार परंडा पोलिसांनी उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्याशी संपर्क करून सदरील माहिती दिली. त्यामहितीच्या आधारे पोलीस पंचनामा करून सर्व कायदेशीर बाबी पार पाडण्यात आल्या. त्यानंतर उस्मानाबाद नगर पालिकेने चार कामगारांच्या मदतीने पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले असल्याची माहिती नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी दिली आहे.
Population | लॉकडाऊनमुळे लोकसंख्या वाढण्याची शक्यता, फाऊंडेशन फॉर रिप्रॉडक्टिव्ह हेल्थ सर्विसेसचं भाकित