Maratha Reservation Andolan : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या मराठा आरक्षणाच्या (Maratha Protest) लढ्यातील दुसरा अध्यायाला आजपासून सुरूवात झाली आहे. राज्य सरकारला (Maharashtra Government) दिलेलं 40 दिवसांचं अल्टिमेटम आज संपलं आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांनी जाहीर केल्याप्रमाणे ते आजपासून आमरण उपोषणाला (Hunger Strike) सुरुवात करत आहेत. सरकारला मराठा आरक्षणाचं गांभीर्य असतं, तर 41 वा दिवस उजाडला नसता, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. 'पंतप्रधान मोदींना (PM Narendra Modi) गरीबांचा कळवळा आहे, पण आता मला शंका यायला लागली आहे. काहीतरी आत शिजतंय, नाहीतर मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde) छत्रपती शिवरायांची शपथ घेतली नसती', असाही दावा जरांगे यांनी केला आहे. 


'नाहीतर मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली नसती'


मुख्यमंत्र्यांना आरक्षण देण्यापासूव कुणीतरी रोखतंय, असा दावा जरांगे यांनी केला आहे. 'अडचण असल्याशिवाय आणि मुख्यमंत्र्यांची तळमळ पाहता काहीतरी हाय. नाहीतर त्यांनी शपथ घेतली नसती. काहीतरी आत शिजतंय, त्यांनी 40 दिवस घेतलेच नसते. मी शब्द देऊन सांगतो काहीतरी आत शिजतंय, हे 100 टक्के आहे. कुणीतरी आड येतंय. आम्ही जवळपास त्याचा शोध घेतलाय, थोडा वेळ थांबा, सगळं समोर येईल', असा गंभीर आरोप जरांगे यांनी केला आहे.


पंतप्रधान मोदींच्या भूमिकेबाबत शंका


'पंतप्रधान मोदी यांनी फक्त एक फोन लावला तरी, आरक्षण मिळेल. पण, हे उगाच आंतरवालीला कागदं घेऊन पळत आहेत. तेही शपथवाले आणि मीही शपथ घेऊन सांगतो, मोदी साहेबांचा दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या तिघांना फक्त फोन येऊ दे, लगेच आरक्षणाचा कागद येईल. पण, त्यांना गोरगरीबांकडे लक्ष द्यायला वेळ नाही', असं जरांगे यांनी म्हटलं आहे.


नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील? : पाहा व्हिडीओ 


Manoj Jarange Patil : गिरीश महाजन यांचा मनोज जरांगेंना फोन! '100 टक्के आरक्षण देणार, उपोषण मागे घ्या'


जिल्हा पातळीवर साखळी उपोषण


मराठा समाजाला (Maratha Reservation) ओबीसी (OBC) तून आरक्षण द्या, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. दरम्यान, राज्य सरकारला (Maharashtra Government) दिलेलं 40 दिवसांचं अल्टिमेटम आज संपलं आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांनी जाहीर केल्याप्रमाणे ते आजपासून आमरण उपोषणाला बसणार आहेत. तसेच, प्रत्येक जिल्हा पातळीवर साखळी उपोषण करण्यात येणार आहे. तसेच पुढाऱ्यांनांही गावबंदी करण्यात येणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Maratha Reservation : मुख्यमंत्र्यांना आरक्षण देण्यापासून कोण अडवतंय? ते शोधणार, जरांगे पाटलांचा निर्धार