Manoj Jarange On Maratha Reservation : मराठा समाजाचे नेते (Maratha Leader) मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या आंदोलनाचा (Maratha Protest) दुसरा पार्ट आजपासून सुरू होणार आहे. मराठा समाजाला (Maratha Reservation) ओबीसी (OBC) तून आरक्षण द्या, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. दरम्यान, राज्य सरकारला (Maharashtra Government) दिलेलं 40 दिवसांचं अल्टिमेटम आज संपला आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांनी जाहीर केल्याप्रमाणे ते आजपासून आमरण उपोषणाला बसणार आहेत. तसेच, प्रत्येक जिल्हा पातळीवर साखळी उपोषण करण्यात येणार आहे. तसेच पुढाऱ्यांनांही गावबंदी करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी 11 वाजता मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सरकारला थोडा वेळ देण्याची विनंती
राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे यांना सरकारला थोडा वेळ देण्याची विनंती केली आहे. मात्र, यावर मनोज जरांगे यांनी आता कोणालाही वेळ दिला जाणार नाही, त्यांनीच वेळ घेतलेला आहे. चाळीस दिवसाचा आणि समाजाने मुख्यमंत्र्यांच्या सन्मान ठेवला आहे एक महिन्यापेक्षा अधिक दिवस सरकारला दिले होते, वेळ त्यांनी स्वतः घेतलेला आहे, त्यामुळे आता वेळ मिळू शकत नाही, अशी स्पष्ट भूमिका जरांगे यांनी घेतली आहे.
'आरक्षण द्या, मी उपोषणाला बसत नाही'
जरांगे यांनी पुढे म्हटलं, गिरीश महाजन साहेबांनी सांगितले की, उपोषणाला बसू नका शरीराला ताण होईल तर मग आरक्षण द्या, मी उपोषणाला बसत नाही, असंही त्यांनी यावेळी सांगितले शब्द त्यांनी दिला. चार दिवसात कायदा पारित होत नाही म्हणून वेळ द्या. असं गिरीश महाजन यांनी सांगितलं होतं कायद्याचा आधार घेऊन कायदा पारित करावा लागेल त्यासाठी एक महिन्याचा वेळ मागितला होता आम्ही चाळीस दिवस दिले मग आता वेळ कशासाठी पाहिजे समाज म्हणून आम्ही त्यांना एक घंटाही वेळ देऊ शकत नाही तुम्ही आज रात्रीच आरक्षण जाहीर करा असेही त्यांनी सुनावलं आहे.
जरांगे यांची मराठा समाजाला कळकळीची विनंती
जरांगे यांनी मराठा समाजाला आत्महत्या न करण्याची विनंती करत सोबत लढण्याचं आवाहन केलं आहे. मराठा समाजाला कळकळीची विनंती आहे आत्महत्या करू नका आरक्षण कसे देत नाही ते आम्ही पाहू माझ्या खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी तुम्ही उभे रहा माणसे कमी होता कामा नये. आता आमरण उपोषण सुरू केले जाणार असून त्यामध्ये उपचारही घेतले जाणार नाही. पाणी घेतले जाणार नाही, टोकाचं उपोषण केलं जाणार, असेही मनोज जारांगे पाटील यांनी सांगितलंय.