जमिन वाटणीच्या वादातून सैनिक मुलाकडून आईची हत्या
एबीपी माझा वेब टीम | 15 Aug 2016 01:29 PM (IST)
अहमदनगर: येथील पारनेरला जमिनीच्या वाटणीसाठी सैनिक मुलानेच आईची हत्या केल्याची घटना घडली आहे. ताराबाई मांडगे असे त्या आईचे नाव असून, मुलगा युवराज मांडगे याला पोलिसांनी अटक केली आहे. अहमदनगरमधील पिंपरी गवळीत राहणारा युवराज मांडगे सैन्यात असून सध्या सुट्टीवर गावी आला होता. त्याला आईच्या नावावरील आठ एकर शेतीची वाटणी हावी होती. मात्र आई त्याला नकार देत असल्यानं, युवराजने आईच्या गळ्यावर मानेवर मारहाण करून तिची हत्या केली. ही घटना सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी मुलगा युवराज मांडगे याला सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.