नागपूर : नागपुरातले भाजप नेते मुन्ना यादव यांच्या मुलाचा उन्माद पुन्हा एकदा पाहायला मिळाला. स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहाचं उन्मादात रुपांतर करत मुन्ना यादव यांच्या मुलानं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी नागपूरमधील वाहतूक काही तास रोखून धरली.

 
यादव यांच्या मुलातर्फे स्वातंत्र्यदिनाच्या रॅलीचं आयोजन नागपूरमध्ये करण्यात आलं होतं. यावेळी डॉल्बीचा मोठ्यानं आवाज करुन कार्यकर्त्यांनी रस्त्यावर धांगडधिंगा घातल्याचं वृत्त आहे. ही रॅली काढताना काही जण बसच्या टपावर चढूनही नाचत होते.

 
या सगळ्या प्रकारामुळे मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जाम झाला. दुसरीकडे शिवसेनेचे नेते तोतवानी यांनीही स्वातंत्र्यदिनाची रॅली काढली होती. मात्र भाजप नेत्यांच्या या मुलानं येऊन धिंगाणा घातल्याचा आरोप होत आहे.