Solapur Wlmik Karad: राज्यात संतोष देशमुख हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरलं असून या प्रकरणातला प्रमुख आरोपी असा आरोप होत असणाऱ्या वाल्मीक कराडांवर 'मोका' अंतर्गत कारवाई करण्याच्या मागणीसाठी दबाव वाढत असताना सोलापूरातही हत्येचा गुन्हा असणारा वाल्मिक कराड पक्षात असून त्याची पक्षातून हकालपट्टी करत अशी मागणी पीडित कुटुंबाने शरद पवारांकडे (Sharad Pawar) केली आहे. सोलापूरचे माजी महापौर प्रमोद गायकवाड यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल असून 31 डिसेंबर रोजी प्रमोद गायकवाड सह त्यांच्या साथीदारांनी वैभव वाघे या तरुणाला पूर्ववैमानस्यातून बेदम मारहाण करत गंभीर जखमी केलं होतं . यात या तरुणाचा मृत्यू झाला होता .या संपूर्ण परिसरात प्रमोद गायकवाड याची दहशत असून मोक्काअंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली . (Solapur news)
सोलापुरात वैभव वाघे या तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च काढण्यात आला . यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि सोलापूरचे माजी महापौर यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात असून 'सोलापूरच्या वाल्मीक कराडाची ' पक्षातून हकलपट्टी करा अशी मागणी या पीडित कुटुंबाने केली आहे.
नक्की प्रकरण काय ?
31 डिसेंबर रोजी प्रमोद गायकवाड आणि त्याच्या साथीदारांनी वैभव वाघे या तरुणाला पूर्ववैमन्यसातून बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या वैभवचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने माजी उपमहापौर प्रमोद गायकवाडसह अन्य आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद गायकवाड याची सिद्धार्थ नगर परिसरात मोठी दहशत असून अशा व्यक्तीची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी सिद्धार्थ नगर येथील रहिवासी आणि पीडित वाघे कुटुंबाने केलीय. वैभव वाघेला श्रद्धांजली वाहण्यासाठी या नागरिकांनी कॅण्डल मार्च आयोजित केला होता. यावेळी शरद पवार गटाचे नेते प्रमोद गायकवाड यांच्यावर जोरदार टीका नागरिकांनी केली. ‘प्रमोद गायकवाड हा सोलापूरचा वाल्मिक कराड आहे. अनेक वर्षांपासून तो नागरिकांना त्रास देतो. खंडणी वसुल करण्यापासून मारहाण करण्यापर्यंत प्रमोद गायकवाडची दहशत असून त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी.‘ अशी मागणी यावेळी करण्यात आली.
हेही वाचा: