सोलापूर : सोलापूर-पुणे पॅसेंजर ट्रेनमध्ये गुंडांनी हैदोस घातला. सोलापूरमधील कुर्डुवाडी पारेवाडी स्टेशनजवळ गाडी असताना 15 ते 20 जणांच्या टोळक्याने लाकडी दांड्याने महिला आणि लहान मुलींना मारहाण केली.


काल (29 मे, सोमवार) दुपारी हा प्रकार घडला. गुंडांच्या अमानुष मारहाणीचा व्हिडीओ समोर आला आहे.

या टोळक्याला लहान मुलीचा पाय लागल्याने वाद सुरु झाला आणि त्याचं रुपांतर तुफान हाणामारीत झालं. या मारहाणीत भीमराव भोसले आणि प्रेमा भोसले हे प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

या प्रकरणी दौंड पोलिसांनी 10 जणांना अटक केली आहे. या गुंडांना कठोर शिक्षा करण्याची मागणी पीडित महिलांनी केली आहे.

पाहा व्हिडीओ