यावेळी एबीपी माझाशी बोलताना केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ''शेतकऱ्यांची भेट घेऊन, त्यांच्या समस्या जाणून घेण्याची हिंमत सरकारमध्ये नाही. आम्हाला यात्रेदरम्यानही सरकारकडून कोणतंही सहकार्य मिळालं नसल्याचं सांगत, पुढील काळात हे आंदोलन अधिक तीव्र करणार असून, त्यावेळी राज्यकर्त्यांची पळताभूई होईल,'' असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
विशेष म्हणजे, सदाभाऊ खोत यांच्या अनुपस्थितीवर विचारले असता, त्यासंदर्भात संघटना लवकरच निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, राजू शेट्टींच्या आत्मक्लेश यात्रेमुळे काल मुंबईत वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. आज लालबागवरुन निघणाऱ्या मोर्चामुळे प्रवाशांचा खोळंबा होण्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे.
काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं काढलेल्या आत्मक्लेश यात्रेत राजू शेट्टी यांचा मुलगा सौरभ शेट्टी याला चक्कर आली होती. उष्णतेमुळे ही चक्कर आल्याचं समजतं आहे. सौरभला माटुंगामधील फाईव्ह गार्डनमध्येच सलाईन लावण्यात आलं. आज राजू शेट्टी राज्यपालांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या