Solapur News: सोलापूर महापालिकेच्या तुळजापूर रोडवरील कचरा डेपोला गुरुवारी लागलेली आग अजूनही धुसमत आहे. सध्याच्या स्थितीत आग नियंत्रणात असली तरी धूर मात्र वाऱ्यासोबत शहरात शिरला आहे. कचरा डेपोच्या शेजारील वस्तीमध्ये राहणाऱ्या लोकांची तर अक्षरशः घुसमट होतेय. धूर आता हिप्परगा, शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत पोहोचला आहे. 


शेजारी सोलापूर तुळजापूर महामार्ग, सोलापूर पुणे महामार्ग असल्याने या महामार्गवरून जाणाऱ्या वाहन चालकांना देखील त्रास सहन करावा लागतोय. अनेकांना डोळ्यांची जळजळ, श्वसनाचा त्रास होतोय. तुळजापूर रोड कचरा डेपोचा परिसर 50 एकर हुन अधिक भागात आहे. गुरुवर संध्याकाळपासून महापालिकेचे अग्निशमन दल रोज 50 ते 60 गाड्यांचा पाणी फवारा करीत आहे. यामुळे आग नियंत्रणात जरी असली तरी वाऱ्यामुळे आग पसरत आहे. तसेच मोठ्या प्रमाणात धूर देखील होतेय.


दरम्यान, या सगळ्या परिस्थितीवर तात्काळ उपाय शोधण्याची मागणी स्थानिक लोक करत आहेत. या विषयात भाजप पदाधिकाऱ्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत जाऊन कचरा डेपो पाहणी केली. तसेच आमदार प्रणिती शिंदे यांनी आज आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मुख्य सचिव यांच्याशी बोलणं केलं आहे. कचरा डेपो जवळ असलेल्या हिप्परगा तलावाच्या कनॉलचे गेट उघडून पाणी पोहोचवण्यास सांगितलं आहे. तसेच गरज पडल्यास चॉपरचा वापर करावा अशी देखील विनंती त्यांनी केलीय. आग काही प्रमाणत आटोक्यात असली तरी उद्यापर्यंत धूर आटोक्यात आणण्याचे प्रयत्न होतील, अशी माहिती प्रणिती शिंदे यांनी दिली आहे. दरम्यान, आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहे. यामध्ये स्थानिक लोकही मदत करत आहेत. ही आग लवकरच आटोक्यात येईल, अशी अशा व्यक्त स्थानिकांना आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: