सोलापूर : उजनी धरणातून भीमा नदीत 26 हजार 600 क्युसेक विसर्गने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळं नदीकाठच्या लोकांना प्रशासनाने दिला सावधानतेचा इशारा दिला आहे. सध्या पुणे जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे वरील सर्व धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी उजनी धरणाकडे येत आहे. हा विसर्ग 30000 क्युसेक पेक्षा जास्त होणार आहे. सध्या उजनी धरण जवळपास 96 टक्के भरलेले आहे. पुणे जिल्ह्यातील धरणातून उजनीत येणारे पाणी सोडावे लागत आहे. अजूनही पाऊस वाढत गेल्यास उजनीतून सोडण्यात येणारा विसर्ग वाढवावा लागणार आहे. दुसऱ्या बाजूला वीर धरणातूनही जवळपास साडेपाच हजार क्युसेक निसर्गाने पाणी निरा नदीत सोडण्यात आले आहे. नीरा नरसिंगपूर येथे हे पाणी पुन्हा भीमा नदीत मिसळत असल्याने चंद्रभागेची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. 

जून महिन्यातच एवढा प्रचंड पाणीसाठा जमा झाल्यानंतर उजनी धरण 75 टक्क्यांच्या वर भरले होते. त्यानंतर पाणी सोडण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर जुलै महिन्यात पावसाचा जोर काहीसा कमी आला आहे. दरम्यान, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु आहे. त्यामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 

हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस, अनेक गावांचा संपर्क तुटला

हिंगोली जिल्ह्यांमध्ये आज सकाळपासूनच कुठे हलक्या तर कुठे जोरदार स्वरूपाचा पाऊस पडतोय. या पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील भंडारी गावाजवळ असलेल्या ओढा पूर आल्याने पुराचे पाणी रस्त्यावरून वाहून जात होतं परिणामी रस्त्यावरील वाहतूक बंद झाली आहे. या रस्त्यावरून सायंकाळच्या सुमारास सेनगाव हिंगोली या शहरात कामानिमित्त गेलेल्या अनेक नागरिकांना गावाकडे जाता येत नाही तर शाळा सुटल्यानंतर मुलींना गावी सोडणारी परिवहन विभागाची बस सुद्धा या पुरामुळे अडकून बसली आहे. सध्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये प्रवासी ताटकळत थांबले आहेत. परिणामी पुढील अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे.

दरम्यान, जालना बुलढाणा, परभणी, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. वाहतुकीवर देखील काही प्रमाणात परिणाम झाला आहे. 

महत्वाच्या बातम्या:

आषाढी संपताच उजनी धरणातून विसर्गाच्या हलचाली; चंद्रभागा पुन्हा खळाळणार, गोसेखुर्दसह नाशकातल्या 13 धरणांमधूनही विसर्ग, पहा कुठे काय स्थिती?