Raigad Boat Accident : रायगडच्या (Raigad) खांदेरी किल्ल्याजवळ बोट बुडाल्याची माहिती समोर आली आहे. उरण करंजा येथील मच्छीमारांची ही बोट होती. मच्छिमारी करण्यासाठी जात असताना हा अपघात घडल्याचं समोर आलं आहे. या बोटीवर एकूण 8 मच्छीमार नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे. यामधील पाच खलाशी हे पोहत पोहत अलिबाग तालुक्यातील सासवणे समुद्र किनाऱ्यावर आले आहेत. तर उर्वरित तीन खालाशांचा शोध कोस्टगार्ड आणि नेव्हीकडून सुरु आहे.
ही बोट मच्छीमारी करण्यासाठी गेली होती, त्यावेळेस हा अपघात घडल्याचं समोर आलं आहे. अलिबागमधील मांडवा पोलीस या खालशांचा आणि बुडालेल्या बोटीचा शोध घेत आहेत. पोहत आलेल्या पाच खलाशांना अलिबाग जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. रायगड जिल्ह्यात सध्या जोरदार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. काही भागात वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. धरणांच्या पाणीसाठ्यात देखील वाढ झाली आहे.
महत्वाच्या बातम्या: