Solapur Accident News : सोलापूर-पुणे महामार्गावर भिमानगर येथे ट्रक आणि मळी वाहक टँकरचा भीषण अपघात झालाय. या भीषण अपघात पाच जणांचा मृत्यू झाला . तर सहा जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. सोलापूरच्या दिशेने निघालेला मळीचा टँकरच्या चालकांचा ताबा सुटला. त्यामुळे टँकर दुभाजकावरुन समोर उभारलेल्या ट्रकवर जाऊन आदळला. यामध्ये चालकांचा आणि ट्रकमध्ये बसलेल्या इतर व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर सहा व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमीवर पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, माढा तालुक्यात भीमानगर येथील पुलाजवळ शनिवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. मळीचा टँकर आणि तांदळाच्या ट्रक यांच्यामध्ये हा अपघात झालाय. टँकर चालकाचा ताबा सुटल्यानं हा अपघात झालाय. या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झालाय. सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. दोन वाहनांची धडक झाली तेव्हा मोठा आवाज झाला. या आवाजाने परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा त्यांना अपघात घडल्याची माहिती समजली. स्थानिकांनी तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरु केले. तसेच पोलिसांनी तात्काळ कळवले. इंदापूर येथील उप जिल्हा रुग्णालयात जखमीवर उपचार सुरु आहेत. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
उपस्थितांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर-पुणे महामार्गावरुन मळीने भरलेला टँकर प्रवास करत होता. दुसऱ्या बाजूला तांदळाने भरलेला एक ट्रक सोलापूरहून पुण्याच्या दिशेने निघाला होता. याचवेळी भीमानगर येथे आल्यावर टँकर चालकाचा ताबा सुटला. टँकर दुभाजकला धडकला त्यानंतर तो तांदळाच्या ट्रकवर येऊन आदळला. त्यामुळे हा अपघात घडला. यामध्ये पाच जणांना जागीच मृत्यू झाला. तर सहा जण जखमी झाले आहेत.
सध्या एसटीचा संप सुरु असल्याने प्रवासी मिळेल त्या वाहनाने प्रवास करत आहेत. यातच राष्ट्रीय महामार्गावर कामे सुरु असताना याबाबत कोणतेही सुरक्षिततेचे उपाय योजले जात नसल्याने या प्रवाशांचा बळी गेला आहे . मृतांमध्ये किसान रामलू राठोड- पुणे, शिवाजी पवार ट्रक चालक उमरगा, व्यंकट दंडगुजे उमरगा, संजय कवडे टँकर चालक श्रीपूर आणि एका ३० वर्षाच्या पुरुषाचा समावेश आहे ट्रकमधील दत्ता घंटे लोहार , वेंकटसिंह राजपूत उमरगा , सुलोचना गुड्डूसिंह राजपूत ही वृद्ध आणि गौरी दत्त राजपूत या महिलेसह मीनल दत्त राजपूत व धीरज दत्त राजपूत ही दोन लहान मुलेही गंभीर जखमी झाली आहेत. याप्रकरणी ट्रकचा चालक, टॅंकरचा चालक, रस्ते ठेकेदार आणि रास्ता मेंटेनन्स ठेकेदाराच्या विरोधात टेम्भूर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live