सोलापूर: सोलापुरात एका पोलीस उपनिरीक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. धक्कादायक म्हणजे त्यांनी घरी, झाडाला किंवा अन्यत्र गळफास न घेता, उड्डाण पुलावरील कठड्यावरील लोखंडी अँगलला गळफास घेतला.
मारुती राजमाने असं आत्महत्या केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे.
मारुती राजमाने यांनी शेळगी उड्डाण पुलावर आत्महत्या केली. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
शहरात पोलीस दलातर्फे चालवल्या जाणाऱ्या पेट्रोल पंपावर त्यांची नियुक्ती होती. रविवारी पेट्रोल पंपावरची 5 लाखांची रोकड पोलीस मुख्यालयात नेताना ती चोरट्यांनी पळवली होती. मारुती यांना चोरट्यांनी मारहाणही केली होती.
या चोरीप्रकरणी पोलिसांचा संशय मारुती यांच्यावरच होता. त्यामुळे ते खूप तणावात होते, असं त्यांच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे. बदनामीच्या भीतीनं त्यांनी आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे.