सोलापुरात प्रचंड पावसात धडक कारवाई, हातभट्टी अड्डे उध्द्वस्त
एबीपी माझा वेब टीम | 14 Sep 2016 11:47 AM (IST)
सोलापूर: सोलापुरात सध्या जोरदार पाऊस कोसळत असताना, या पावसात पोलिसांनी डॅशिंग कामगिरी केली आहे. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी प्रचंड पावसात हातभट्टी दारुअड्डे उद्ध्वस्त केले. मुळेगाव आणि बक्षी हिप्परगे इथं ही धडक कारवाई करण्यात आली. पोलिसांनी तब्बल 188 बॅरेल, 37 हजार लिटर रसायनासह 8 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांच्या विशेष पथकाने ही धडक कारवाई केली. आज सकाळीच पोलिसांनी ही छापेमारी केली. अवैध धंदे रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी स्थापन केलेल्या विशेष पथकाची महिनाभरातली ही सहावी कारवाई आहे.