लातूर: लातूरजवळच्या नया चांडेश्वर गावात अवघ्या साडेतीन वर्षांच्या मुलीवर तिच्या काकांनीच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यातील एक आरोपी बारावीला तर एक दहावीला आहे. या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.



ही घटना समोर आल्यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवली. त्यानंतर पोलिसांनी पीडित मुलीच्या चुलत्यात ताब्यात घेतलं. यातील एक आरोपी हा बारावीला आहे तर दुसरा आरोपी हा दहावीत शिकत असल्याची माहिती समजते आहे.



या घटनेनं गावात एकच खळबळ माजली आहे. दोन्ही आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावं अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.