धाब्यावर काम करणारा राजेश नेहमीच आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. कायमच्या वादाला कंटाळून दोघेही काही दिवसांपासून विभक्त राहात होते. राजेंद्र कधी तरी घरी यायचा. त्यावेळी राजेंद्र रूपालीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्याशी वाद घालायचा.
सोमवारी रात्रीही त्यांचं भांडण झालं. वाद विकोपाला गेल्याने राजेंद्रने आपल्या सोबत आणलेल्या धारदार शस्त्राने वार केले. रूपालीचा जागीच मृत्यू झाला. त्यातच राजेशनं तिची हत्या केली. हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तपास करत आरोपी राजेंद्रला अटक केली.