सोलापूर : पंढरपूरमध्ये बँक महाराष्ट्र बँकेवरील 70 लाखांच्या दरोड्याची पोलिसांनी 12 तासात उकल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मंगळवेढा परिसरातून गाडीसह एकाला अटक केली आहे. शिवाय चोरलेली रक्कमही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
सांगोल्याहून पंढरपूरकडे बँक ऑफ महाराष्ट्रची 70 लाखांची रक्कम बुधवारी खाजगी वाहनाने नेण्यात येत होती. बॅंक ऑफ महाराष्ट्र सांगोला शाखेचे व्यवस्थापक अमोल भोसले खासगी आय20 कारने ( MH 45 N 5831) ही रोकड घेऊन निघाले होते.
पंढरपुरात बँक ऑफ महाराष्ट्रच्या 70 लाखांच्या रकमेची लूट
त्यांच्या कारला बोलेरो गाडी आडवी लावून गाडीची काच फोडण्यात आली. चोरट्यांनी गाडीतील दोघांच्या डोळ्यात चटणी फेकली आणि पैसे घेऊन पोबारा केला.
याप्रकरणी महाराष्ट्र बँकेचे व्यवस्थापक अमोल भोसलेंची भूमिकाही संशयास्पद असून त्यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. याशिवाय मंगळवेढ्यातील राजकीय पक्षाच्या मोठ्या नेत्याचाही या चोरीत समावेश असल्याचं म्हटलं जात असून त्याचीही चौकशी सुरु आहे.