Solapur News Praniti Shinde Speech : योगी आणि महाराजांची जागा मंदिर आणि मठात आहे. राजकारणात नाही, अशा शब्दात काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी टीका केली आहे. योगी आणि महाराजांची (Yogi and Maharaj)जागा मठात असून ते जेव्हा जेव्हा राजकारणात आले तेव्हा देशाचं वाटोळं झालं, असं देखील प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे.


सोलापुरातील कॉंग्रेसच्या विजय संकल्प मेळाव्यात प्रणिती शिंदे यांनी ही टीका केली प्रणिती शिंदे म्हणाल्या की, योगी आणि महाराजांबद्दल आम्हाला आदर आहे, पण जेव्हा योगी-महाराज राजकारणात येतात तेव्हा देशाचं वाटोळे सुरु होते. जे काम करतात त्यांना मतदान देणं महत्वाचं आहे. लोकशाही टिकवायची असेल तर कामाला महत्व द्या, असं देखील प्रणिती शिंदे म्हणाल्या.


भाजपवर टीका करताना शिंदे म्हणाल्या की, निवडणुकीच्या वेळी शेतकऱ्यांचे काळे कायदे रद्द केले. वर्षभर आंदोलन केलं. 700 शेतकऱ्यांचा बळी घेतला. यूपीचं इलेक्शन आलं म्हणून कायदे रद्द केले. देशाला तोडण्याची ही लोकं भाषा करतात, असं त्यांनी म्हटलं. काही दिवसांपूर्वी प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान मोदींवर देखील टीका केली होती. त्यांनी म्हटलं होतं की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान ही अनमोल देणगी दिली आहे. केंद्रातील भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यामुळे संविधान आणि देशाची लोकशाही धोक्यात आली आहे, असं त्यांनी म्हटलं होतं.


प्रत्येकाच्या जागा आम्ही सांगितल्या तर तुम्हाला चालतील का?- भाजप


दरम्यान प्रणिती शिंदे यांच्या या टीकेला भाजप युवामोर्चाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. 'ताई, तशा प्रत्येकाच्या जागा आम्ही सांगितल्या तर तुम्हाला चालतील का?' असा सवाल भाजपा युवा मोर्चा सोलापूर जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे यांनी केला आहे.



 


महत्वाच्या बातम्या