सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या इतिहास पहिल्यांदाच कमळ फुललं आहे. 1964 मध्ये महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर प्रथमच भाजप सत्तेवर येण्याची चिन्हं आहेत. 102 पैकी 49 जागांवर विजय मिळवत भाजप एकहाती सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

सोलापूर महापालिकेत भाजपला 49 जागा मिळाल्या आहेत, म्हणजेच बहुमतापासून अवघ्या दोन जागा भाजप दूर आहे. शिवसेना 21 जागांवर विजयी झाली आहे. काँग्रेस 14 जागा मिळवत तिसऱ्या तर एमआयएम 9 जागा मिळवत चौथ्या स्थानावर आहे. राष्ट्रवादी आणि बसपला प्रत्येकी 4 जागा, तर माकपला 1 जागा मिळाली आहे. मनसेला मात्र सोलापूर महापालिकेत खातं उघडता आलं नाही.

यंदाच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच चार सभासदांचा एक प्रभाग आहे. एकूण 26 प्रभाग असल्यामुळे 102 सदस्य निवडून आले आहेत. (24 आणि 3 सदस्यांचे दोन प्रभाग)

पक्षीय बलाबल कसं ?

  • भाजप 49,

  • शिवसेना 21,

  • काँग्रेस 14,

  • राष्ट्रवादी 04,

  • मनसे 00,

  • MIM 09,

  • बसप 04,

  • माकप 01


महत्त्वाचे विजय : 

  • सोलापूर प्रभाग क्रमांक 13 मधून माजी आमदार नरसैय्या आडम यांच्या पत्नी कामिनी आडम विजयी

  • सोलापूर प्रभाग 7 मध्ये सेनेचे चारही उमेदवार विजयी, माजी महापौर (राष्ट्रवादी) मनोहर सपाटे, माजी उपमहापौर (राष्ट्रवादी) पद्माकर काळेंचा पराभव

  • सोलापूर महानगरपालिकेत भाजप इतिहास घडवण्याच्या वाटेवर. 1964 च्या महानगरपालिका  स्थापनेनंतर प्रथमच भाजप सत्तेवर येण्याची चिन्हे.   एकहाती सत्ता स्थापन करण्याकडे भाजपची वाटचाल

  • प्रभाग पाच ड मधून बसपचे आनंद चंदनशिवे विजयी

  • प्रभाग सहा मधून युवा सेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर विजयी

  • विद्यमान महापौर सुशीला आबुटे यांचा पराभव, प्रभाग 24 मधून काँग्रेसच्या आबुटे पराभूत

  • माजी महापौर आरिफ शेख पराभूत, भाजपच्या चिन्हावर प्रभाग 15 मधून उमेदवार

  • पालकमंत्री विजय देशमुख यांचे चिरंजीव डॉ. किरण देशमुख विजयी, प्रभाग क्रमांक 2 मध्ये विजयी

  • सोलापूर प्रभाग 16 मधून माजी महापौर, काँग्रेस उमेदवार संजय हेमगड्डी यांचा पराभव


सोलापूर महानगरपालिका विजयी उमेदवार

१ अविनाश पाटील भाजप
रवी गायकवाड भाजप
राजश्री कणके भाजप
निर्मला तांबे भाजप
*
२ किरण देशमुख भाजप
नारायण बनसोडे भाजप
कल्पना कारभारी भाजप
शालन शिंदे भाजप
*
३ सुरेश पाटील भाजप
संजय कोळी भाजप
अंबिका पाटील भाजप
वरलक्ष्मि गड्डम भाजप
*
४ अमित पाटील भाजप
वंदना गायकवाड भाजप
विनायक विटकर भाजप
सुरेखा काकडे भाजप
*
५ आनंद चंदनशिवे बसप
स्वाती आवळे बसप
गणेश पुजारी बसप
ज्योती बामगोडे बसप
*
६ गणेश वानकर सेना
मनोज शेजवाल सेना
ज्योती खटके सेना
वत्सला बरगंडे सेना
*
७ देवेंद्र कोठे सेना
अमोल शिंदे सेना
सारिका पिसे सेना
मंदाकिनी पवार सेना
*
८ अमर पुदाले भाजप
नागेश भोगडे भाजप
शोभा बनशेट्टी भाजप
सोनाली मुठकेरी भाजप
*
९ राधिका पोसा भाजप
रामेश्वर बिर्रू भाजप
नागेश वल्याळ भाजप
अविनाश बोम्ड्याल भाजप
*
१० प्रथमेश कोठे सेना
सावित्री समल सेना
मीरा गुर्रम सेना
विठ्ठल कोठा सेना
*
११ राजकुमार हंचाटे सेना
कुमुद अंकाराम सेना
अनिता मगर सेना
महेश कोठे सेना
*
*
१२ विनायक कोन्द्याल सेना
शशिकला बात्तुल भाजप
देवी झाडबुके भाजप
राजेश अन्गीरे भाजप
*
*
१३ सुनील कामाठी भाजप
कामिनी आदम माकप
श्रीनिवास रिकमल्ले भाजप
प्रतिभा मुद्गल भाजप
*
*
१४ रफिक हत्तुरे कॉंग्रेस
रियाज खैरडी mim
शहजीदाबनो mim
वाहिदाबनो mim
*
*
१५ चेतन नरोटे कॉंग्रेस
विनोद भोसले कॉंग्रेस
श्रीदेवी फुलारे कॉंग्रेस
वैष्णवी करगुळे कॉंग्रेस
*
*
१६ फिरदोस पटेल कॉंग्रेस
नर्सिंग कोळी कॉंग्रेस
कम्प्ली भाजप
संतोष भोसले भाजप
*
*
१७ रवी कैय्यावले भाजप
जुगन आंबेवाले भाजप
नूतन गायकवाड mim
भारत बडूरवाले सेना
*
*
१८ रियाज हुंडेकरी कॉंग्रेस
कांचन यन्नाम भाजप
मंगला पाताळे भाजप
शिवानंद पाटील भाजप
*
*
१९ श्रीनिवास कारली भाजप
अनिता कोंडी भाजप
वरललक्ष्मि पुरुड भाजप
गुरुशांत धुत्तरगावकर सेना
*
*
२० प्रवीण निकाळजे कॉंग्रेस
परवीन इनामदार कॉंग्रेस
अनुराधा काटकर कॉंग्रेस
बाबा मिस्र्ती कॉंग्रेस
*
*
२१ इस्मैल तोफिक mim
इरफान तस्लीम mim
युनुस शेख mim
अझर हुंडेकरी mim
*
*
२२ नागेश गायकवाड राष्ट्रवादी
किसान जाधव राष्ट्रवादी
सुवर्ण जाधव राष्ट्रवादी
पूनम बनसोडे mim
*
*
२३ सुनिता रोटे राष्टवादी
मेनका राठोड भाजप
लक्ष्मन जाधव सेना
उमेश गायकवाड सेना

*
२४ संगीता जाधव भाजप
राजेश काळे भाजप
अश्विनी चव्हाण भाजप
राजश्री बिराजदार भाजप
*
*
२५ सुभाष शेजवळ भाजप
मनीषा हुच्चे भाजप
वैभव हत्तुरे भाजप
*
*
२६ शिवाबाटलीवाला कॉंग्रेस
प्रिया माने कॉग्रेस
राजश्री चव्हाण भाजप

सोलापूर पूर्ण निकाल

भाजप ४९
सेना २१
कॉंग्रेस १४
राष्ट्रवादी ४
mim ९
बसपा ४
माकपा १

2012 चं पक्षीय बलाबल
काँग्रेस – 44
राष्ट्रवादी – 14
भाजप – 26
शिवसेना – 10
बसपा – 3
माकपा – 3
आरपीआय – 1
अपक्ष – 1