सोलापूर : सोलापूर भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या जात पडताळणी प्रकरणी  मुंबई हायकोर्टाकडून खासदारांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. खासदार जयसिद्धेश्वर यांच्या विरोधात खोटं जातप्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी तूर्तास तक्रार दाखल कर नका असे आदेश  मुंबई हायकोर्टाने देण्यात आलं आहे. पण तहसीलदारांकडून रितसर तक्रार दाखल झालेली असल्यास योग्य ती कारवाई करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहे.


दरम्यान याप्रकणी अक्कलकोट नायब तहसीलदारांकडून खासगी फिर्याद दाखल दाखल केली आहे. जात पडताळणी समितीच्या आदेशानुसार दाखल केली खासगी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी सोलापूर जिल्हा न्यायालयात अक्कलकोटचे नायब तहसीलदार संतोष शिरसट यांनी जबाब नोंदवण्यात आला.

सोलापूर भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणी सोमवारी सोलापूर सत्र न्यायालय आणि मुंबई हायकोर्ट यां दोन्ही ठिकाणी एकाच वेळी सुनावणी सुरु होती.

काय आहे प्रकरण?

खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी लोकसभा निवडणुकीत 1982 सालचा बेडा जंगम जातीचा दाखला सादर केला होता. मात्र हा दाखला बोगस असल्याची तक्रार प्रमोद गायकवाड, मिलिंद मुळे, विनायक कंडकुरे यांनी केली होती. त्यावर सोलापुर जिल्हा जात पडताळणी कार्यालयात 15 फेब्रुवारी रोजी अंतिम सुनावणी पार पडली. त्यानंतर हा निकाल राखून ठेवण्यात आला होता आणि तो निकाल 24 फेब्रुवारी रोजी करण्यात आला. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी आपण सादर केलेला दाखला वैध असल्याचे सांगत सन 1344 व 1347 फसली सालातील मोडी लिपीतील नमुना पुराव्यासाठी सादर केला होता. याच्या तपासणीसाठी दक्षता समितीने तपासणी करुन आपला अहवाल सादर केला. या अहवालात खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी पुराव्यासाठी दाखल केलेला नमुना संशयास्पद असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.