वाढदिवस साजरा करताना औरंगाबादेत काँग्रेस नगरसेवकाचा धांगडधिंगा
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद | 04 Dec 2017 01:47 PM (IST)
औरंगाबादेत काँग्रेस नगरसेवकाने वाढदिवस साजरा करताना ओंगाळवाणं प्रदर्शन केलं. ज्याचा नागरिकांनाही त्रास झाला.
औरंगाबाद : वाढदिवस कुणी कसा साजरा करावा, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र औरंगाबादेत काँग्रेस नगरसेवकाने वाढदिवस साजरा करताना ओंगाळवाणं प्रदर्शन केलं. ज्याचा नागरिकांनाही त्रास झाला. नगरसेवक अफसर खान यांनी बेगमपुरा भागातील भर रस्त्यात एक स्टेज उभारलं. या स्टेजवर त्यांनी ‘मैं हूँ डॉन’ गाणं लावून डान्स केला. विशेष म्हणजे त्यांनी स्वतःवर पैशांचाही पाऊस पाडून घेतला. ऑर्केस्ट्रा लावून यावेळी नृत्य करण्यात आलं. धक्कादायक म्हणजे, यावेळी पोलीस अधिकारीही उपस्थित असल्याची माहीती आहे. त्यावर पोलसांनी कुठलाही गुन्हा नोंद केला नाही हे विशेष म्हणता येईल. 30 तारखेच्या रात्री हा सर्व प्रकार झाला घडला. त्याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. कोण आहे अफसर खान? अफसर खान हे औरंगाबाद महापालिकेतील बेगमपुरा भागातील काँग्रेसचे नगरसेवक आहेत. 22 वर्षांपासून ते नगरसेवक आहेत. त्यांनी औरंगाबाद मध्य मतदारसंघातून विधानसभा निवडणूकही लढवली होती. त्यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल आहे. राजकारणात येण्यापूर्वी अफसर खान सिनेमागृहाबाहेर ब्लॅकने तिकीट विक्री करायचे.