सोलापूर : सोलापुरातून आणखी दोन टन एफिड्रिन जप्त करण्यात आलं आहे. त्यासोबत तब्बल अडीच हजार लीटर अॅसेटिक अनहेड्रिड जप्त करण्यात ठाणे पोलिसांना यश आलं आहे.

 
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याची किंमत सुमारे 200 कोटी रुपये असल्याची माहिती आहे. सहा दिवसांच्या शोध मोहिमेनंतर ठाणे पोलिसांच्या दोन पथकांनी हा साठा जप्त केला आहे.

 
सोलापुरातल्या एव्हॉन ऑरगॅनिक कंपनीत हा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणातला मुख्य सूत्रधार पुनित शर्मा फरार आहे.

 
कंपनीचे तीन प्रमुख संचालक राजेश कैमल, अजित कामत आणि मनोज जैन यांची चौकशी सुरु असून उद्यापासून कामगारांची चौकशी केली जाणार आहे.

 
सोलापूरचा तपास पूर्णत्वाकडे आल्याने ठाणे पोलिसांची दोन पथके परतली. चार पथकांनी सोलापुरात मुक्काम करून तपास पूर्ण केला.

 

 

काहीच दिवसांपूर्वी ठाणे पोलिसांनी सुमारे साडे 18 टन एफेड्रिन नावाचं ड्रग्ज पकडलं. या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत तब्बल 2 हजार कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत होतं.

 

 

महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेली ही पहिलीच कारवाई होती.  याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून, यात एका नायजेरियन नागरिकाचाही समावेश आहे.

 

सोलापुरातून हे ड्रग्ज अहमदाबादला पाठवण्यात येत होतं. त्यावेळी ठाण्याजवळ गुजरात रस्त्यावर हे ड्रग्ज पकडण्यात आलं. गेल्या दीड वर्षापासून हे रॅकेट सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

 

संबंधित बातम्या :


18 टन, 2 हजार कोटींचं एफेड्रिन ड्रग्ज जप्त