Nashik, Solapur Drug Case : सोलापूर : राज्यात पुण्यातील ससून रुग्णालयातील ललित पाटील ड्रग प्रकरण गाजत असतानाच नाशिकच्या (Nashik News) ड्रग्स प्रकरणाचे सोलापूर (Solapur News) कनेक्शन उघडकीस आलं आहे. मुंबई (Mumbai), पुणे पोलिसांनी (Pune Police) नाशिकमध्ये येऊन कारवाई करत असताना नाशिक पोलिसांनी (Nashik Police) दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांत मुंबई आणि सोलापूरमध्ये धडाकेबाज कारवाई केली आहे. या दोन्ही गुन्ह्यांचा ललित पाटील प्रकरणाशी अद्याप कुठलाही संबंध नाही. नाशिक रोड परिसरातील ड्रग्सच्या गुन्ह्याचा माग काढताना नाशिक पोलिसांनी सोलापुरातील ड्रग्सचा कारखाना उध्वस्त केला असून सुमारे 10 कोटी रुपयांचे मुद्देमाल जप्त केलाय, नाशिकमध्ये सोलापूरमधून ड्रग्ज येत असल्याचं तपासात उघडकीस आलंय. तर नाशिकच्या वडाळा गावातील ड्रग्ज रॅकेटचा तपास करताना मुंब्र्यातून दुसऱ्या संशयिताला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. शब्बीर असे या संशयिताचं नाव आहे. 


चार दिवसांपूर्वी नाशिक पोलिसांनी सलमान नावाच्या ड्रग्स पेडलरला अटक केली होती. सलमान नाशिकपर्यंत ड्रग्स सप्लाय करायचा त्याला शब्बीर ड्रग्स पुरवठा करत असल्याची माहिती समोर आली. मुबंईतील रॅकेटची साखळी शोधण्यात नाशिक पोलिसांना यश आलं आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक आणि क्राईम ब्रँचच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली आहे.


ड्रग्ज प्रकरणात नाशकात तीन वेगवेगळे गुन्हे 


आतापर्यंत नाशकात ड्रग्ज प्रकरणी तीन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. सर्वात पहिला गुन्हा ललित पाटील ड्रग प्रकरणात दाखल करण्यात आला होता. यासंबंधित गोडाऊन नाशिक पोलिसांनी उध्वस्थ केले होते. याचा तपास स्वतंत्रपणे नाशिक पोलिसांकडून सुरू आहे. याप्रकरणातील गुन्हेगार मुंबई आणि पुण्यातील आरोपींशी संबंधित आहेत. पण काल (शुक्रवारी) पोलिसांनी जी कारवाई केली आहे, ती एका ड्रग रॅकेटसंदर्भातील आहे. नाशिकमध्ये ड्रग्जचा पुरवठा करण्यासाठी आरोपींनी सोलापुरात कारखाना सुरू केला होता. गेल्या 10 ते 12 दिवसांपूर्वी सोलापुरात आणखी एक कारखाना उध्वस्त केला होता. ते प्रकरण आणि कालचं प्रकरण पूर्णपणे वेगळं आहे. पोलिसांनी कारवाई केलेल्या कारखान्यात प्रयोगशाळा तयार करण्यात आली होती. त्यासोबतच ड्रग्जचा साठा, कच्चा मालही सापडला आहे.


नाशिकच्या वडाळागाव परिसरात छोटी भाभीचं ड्रग रॅकेट होतं. तिला आणि तिच्या पतीला पोलिसांनी आधीच अटक केली होती. आतापर्यंत चौघांना याप्रकरणी अटक करण्यात आली होती. नाशिक पोलिसांनी सलमान नावाच्या ड्रग्स पेडलरला अटक केली होती. सलमान नाशिकपर्यंत ड्रग्स सप्लाय करायचा त्याला शब्बीर ड्रग्स पुरवठा करत असल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, नाशिक पोलिसांची ड्रग्स प्रकरणातील कारवाई सध्या संपूर्ण राज्यभरात सुरू आहे. 


पाहा व्हिडीओ : Solapur Drugs Case : नाशिक ड्रग्ज प्रकरणाचं सोलापूर कनेक्शन उघड, कारवाईत 10 कोटींचा मुद्देमाल जप्त