सोलापूर: सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांच्यातील सत्तासंघर्षामुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. उपनिबंधकांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे पणन मंडळाने या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.

पणन मंडळाच्या या निर्णयानंतर येत्या 15 दिवसात प्रशासक नियुक्तीचे दिले आदेश मंडळाने प्रशासनाला दिले आहेत.

सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि बाजार समिती सभापती दिलीप माने यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सत्तासंघर्ष सुरु होता. यातूनच सुरु असलेल्या राजकीय स्पर्धेत बाजार समितीचा बळी गेल्याची चर्चा सध्या रंगली आहे. पणन मंडळाने पंचवार्षिक निवडणुकीची मागणी फेटाळत थेट बरखास्तीचा निर्णय घेतला.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा व्यापारासाठी प्रसिद्ध बाजारपेठ आहे. या बाजार समितीची उलाढाल तब्बल पाच कोटींच्या वर असून 'अ' वर्गातली महत्वाची बाजार समिती म्हणून याची गणना केली जाते.

मात्र, सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि बाजारसमितीचे सभापती दिलीप माने यांच्यातील सत्तासंघर्षामुळे बाजार समितीचा बळी गेल्याची चर्चा सध्या रायकीय वर्तुळात रंगली आहे.