अमरावतीः औरंगाबादपासून सुरु झालेला मराठा समाजाचा मोर्चा आता राज्यभर विस्तारला आहे. आज अमरावतीत मराठा क्रांती मोर्चा काढण्यात आला. या मोर्चातही लाखोंचा जनसागर रस्यावर उतरला होता.
अमरावतीमध्ये कडाक्याचं उन असूनही मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाने या मोर्चात सहभाग घेतला. तर काही आंदोलनकर्त्यांना कडाक्याच्या उन्हाचा त्रासही झाला. नेहरु मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गानं हा मोर्चा निघाला. शेवटी गर्ल हायस्कूलमध्ये निवेदनाचं वाचन करण्यात आलं आणि त्यानंतर निवेदन देऊन मोर्चा संपल्याचं घोषित करण्यात आलं.
कोपर्डी प्रकरणातल्या आरोपींना फाशीची शिक्षा द्या, तसंच मराठा समाजाला आरक्षण आणि अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करा, अशा प्रमुख मागण्या मराठा आंदोलनकर्त्यांच्या आहेत.