Nagpur : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी दिवसभरात 07 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 45 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मात्र यामध्ये फक्त 'सॉफ्ट' ठरत असलेल्या मॉल्स, कॅफे किंवा मोठी व्यवसायिक प्रतिष्ठानांनाच टार्गेट करण्यात आले. तर, रस्त्यावरील ठेल्यांवर व बाजारातील भाजी विक्रेत्यांपासून मात्र या पथकाने 'सेफ डिसटन्स' ठेवल्याचे दिसून येत आले.


शहरातील जवळपास प्रत्येक फुटपाथवर फास्ट फूड् विक्रेते, पानठेल्यांचे अतिक्रमण आहे. दुसरीकडे भाजीबाजारात सर्रास 'वन टाईम युज' प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर सुरु आहे. मात्र याठिकाणी कारवाईसाठी गेल्यास वाद होण्याची शक्यता असते. त्यामुळे उपद्रव शोध पथकांद्वारे फक्त मॉल्स, मोठे प्रतिष्ठान, कॅफे आदींना 'टार्गेट' करुन आले दैनंदिन 'टार्गेट' पूर्ण करण्यात येत असल्याचे चित्र आहे. दुकान चालवायची असल्याने मनपाच्या लोकांसोबत कोण वाद घालणार त्यामुळे आम्ही दंड भरला असल्याचे नुकतेच दंड भरलेल्या एका प्रतिष्ठान चालकाने सांगितले. दुसरीकडे कॅफेमध्येही किरकोळ कारणावरुन पथकाने कारवाई करुन पाच हजारांचा दंड वसूल केला. मात्र, समोरच फुटपाथवर एक विक्रेता पथकासमोर कॅरिबॅगमध्ये माल विकत असतानाही पथकातील एकाही कर्मचाऱ्याने त्याच्यावर कारवाई करण्याचे धाडस दाखवले नसल्याचे कॅफे चालक म्हणाला. नेहमी कार्यालयात बसणारे अधिकारी आणि नागरिकांशी 'कनेक्ट' नसलेले मनपा आयुक्त यावर कारवाई करतील का असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.


इथे झाली कारवाई!


मनपाच्या उपद्रव शोध पथकाने धंतोली, गांधीबाग, सतरंजीपूरा आणि मंगळवारी झोनमध्ये प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात कारवाई केली.
धंतोली झोन अंतर्गत महात्मा फुले नगर, मानेवाडा रोड येथील साहु चाट सेंटर या दुकानाविरूध्द प्लास्टिक  पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसुल केला. गांधीबाग झोन अंतर्गत बजेरिया, गांधीबाग येथील राज प्लास्टिक या दुकानांविरूध्द प्लास्टिक  पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसुल केला. सतरंजीपूरा झोन अंतर्गत किराणा ओली, मस्कासाथ, इतवारी येथील गुरुकृपा प्लास्टिक या दुकानाविरूध्द प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसुल केला. तसेच मंगलवारी झोन अंतर्गत मंगलवारी बाजार सदर येथील अरेबियन टिक्का या दुकानांविरूध्द प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसुल केला.  त्याचप्रमाणे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत स्वावलंबी नगर येथील मेड प्लस यांच्याविरुध्द दुकानाचा कचरा रस्त्यालगत टाकल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसुल केला. तसेच आशिनगर झोन अंतर्गत आरा मशिन जवळ, लष्करीबाग येथील आर. संदेश ग्रुप यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरवून ठेवल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसुल केला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.


वाचा


Nitin Raut : दिल्लीकडून येणाऱ्या प्रवाशांमुळे शहरात वाढतोय कोरोना, ऊर्जामंत्र्यांची माहिती


राज्यातील शिवसेना आमदारांची स्थिती वाईट, माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला


पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी नागपूर महानगरपालिकेचा सन्मान