अकोला/जळगाव : राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यावर सध्यातरी कुठलीही लस उपलब्ध नसल्याने सोशल डिस्टन्सिग हाच उपाय सांगितला जात आहे. मात्र, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या जिल्हा दौऱ्या दरम्यान सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळाले. आरोग्यमंत्री राजेश टोपे बुधवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. तर, आज त्यांनी अकोला जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. मात्र, दोन्ही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा नावापुरतेच पाहायला मिळाले. अशाने कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.


आरोग्यमंत्री राजेश टोपे आज कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अकोल्यात आले होते. यावेळी आरोग्यमंत्र्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता कार्यालयात बैठक घेतली. मात्र, जनतेला सोशल डिस्टंन्सिंग पाळण्याचं आवाहन करणाऱ्या आरोग्यमंत्र्यांना स्वत:च ते पाळण्याचं भान राहिलं नाही. या बैठकीत अधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार यांची मोठी गर्दी झाली आणि फिजिकल डिस्टन्सिंगचा पार बोजवारा उडाल्याचे पाहायला मिळाले.

MMR क्षेत्रात प्रवासासाठी आता पासची गरज नाही, सरकारकडून काही नियमात बदल

जळगावातही आरोग्य मंत्री टोपे यांना भेटायला गर्दी
जळगाव जिल्ह्यातील वाढती कोरोनाच्या बाधितांची संख्या आणि वाढत्या मृत्यू दराच्या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे हे बुधवारी जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी आणि आमदार खासदार यांच्यासोबत त्यांनी आढावा बैठकीच आयोजन केले होते. बैठक सुरू होण्यापूर्वी जिल्ह्यातील अनेक सामाजिक संस्था आणि व्यक्तींनी त्यांना निवेदन देण्यासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळाले. यावेळी निवेदनाचा अक्षरशः पाऊस पडल्याचे पाहायला मिळाले. मात्र, या दरम्यान, सोशल डिस्टन्सिंग पाळले नसल्याचे निदर्शनास आले.

जळगाव येथे कोरोना विषाणूबाबत घेतली आढावा
जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. ही चिंतेची बाब आहे. मृत्यू दर कमी करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सहकार्याने टास्क फोर्स गठित करुन त्यांचा सल्ला व औषधोपचार घ्यावेत. तसेच कोरोना विषाणूचा तपासणी अहवाल 24 तासांत प्राप्त होईल, असे नियोजन करावे, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले. मंत्री टोपे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, खासदार रक्षाताई खडसे, खासदार उन्मेश पाटील, महापौर भारतीताई सोनवणे, आमदार गिरीश महाजन, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एन. पाटील, पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

Health Minister on #Corona 'या महामारीला न घाबरता त्यासोबत जगण्याचं कौशल्य प्राप्त करा '- राजेश टोपे