दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो


1. दक्षिण आफ्रिकेतील ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्र्यांनी बोलवली बैठक
MVA govt on Coronavirus new Omicron Variant : आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने जगभरात खळबळ उडाली आहे. जगातील अनेक देश सतर्क झाले असून कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटचा संसर्ग होऊ नये यासाठी पावले उचलली जात आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारही सतर्क झाले असून विषाणूच्या या नव्या संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी राज्य सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. महाविकास आघाडी सरकारकडून दक्षिण आफ्रिकेतून सुरू असणाऱ्या विमान सेवेवर बंदी घालण्याचा विचार राज्य सरकारकडून सुरू आहे. आज संध्याकाळी पाच वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील कोरोना परिस्थिती आणि नव्या व्हेरियंट बाबत करण्यात आलेल्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. या बैठकीला आरोग्य मंत्री राजेश टोपे, टास्क फोर्सचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. 


2.  मास्क आणि प्रवासासाठी राज्य सरकारची कठोर नियमावली, विनामास्क असल्यास 500 रुपयांचा दंड


3. जगातील नऊ देशात ओमिक्रॉनचा धुमाकूळ, दक्षिण आफ्रिकेतून कर्नाटकात आलेले दोघं कोरोना पॉझिटिव्ह


4. सरकारची दोन वर्षपूर्ती! मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, कितीही संकट आली तरी सरकार खंबीर!


5.मुंबईत टॅक्सीचालकांचा संपाचा इशारा, सीएनजी महागल्याने प्रवासी भाडेदरात 5 रुपये वाढ करण्याची मागणी



6. सोलापुरात एटीएम क्लोनिंगचा प्रयत्न, एटीएमच्या रीडरसमोर आढळलं संशयास्पद उपकरण, सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरु
7. पान, सुपारी, पानमसाला खा अन् डोकं शांत ठेवा, मंत्री जितेंद्र आव्हाडांचा अजब सल्ला
8. जगभरातील टॉप 100 प्रदुषित शहरात भारताची तब्बल 46 शहरं, गाझियाबादची हवा सर्वाधिक विषारी
Polluted Cities : सध्या राजधानी दिल्लीसह उत्तरेकडील राज्यांमधल्या प्रदूषणाचा मुद्दा देशभर गाजतोय. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं. नवी दिल्लीतील लोकांचा वायू प्रदूषणाने श्वास रोखून धरलाय. मात्र, फक्त राजधानी दिल्लीच नव्हे तर भारतातील तब्बल 46 शहरांतील नागरिक देखील प्रदूषणाच्या विळख्यात अडकल्याचे चित्र आता समोर आलं आहे. जगभरातील टॉप 100 प्रदुषित शहरांमध्ये भारतातील तब्बल 46 शहरांचा समावेश आहे. जगभरातील हवेची गुणवत्ता तपासणाऱ्या IQAir ने प्रदुषित शहराची यादी जाहीर केली आहे. यामध्ये जगभरातील टॉप 100 प्रदुषित शहरांमध्ये भारतातील 46 शहरं, चीनमधील 42 शहरांचा समावेश आहे. तर पाकिस्तानमधील 6 आणि बांगलादेशमधील 4 शहरांचा समावेस आहे. इंडोनेशिया आणि थायलँड या देशातील प्रत्येकी एका शहरांचा या यादीत समावेश आहे. या सर्व शहरांतील PM2.5 एयर क्‍वालिटी रेटिंग 50 पेक्षा जास्त आहे.  धक्कादायक बाब म्हणजे, जगातील आघाडीच्या दहा प्रदुषित शहरांमध्ये भारतातील ९ शहरांचा समावेश आहे. चीनमधील होटान शहराची हवा जगभरात सर्वाअधिक विषारी राहिली आहे. या शहराचा PM2.5 रेटिंग 2020 मध्ये सरासरी 110.2 इतका राहिलाय. 


9. हिवाळी अधिवेशनाआधी राजधानीत बैठकांचं सत्र, पंतप्रधान मोदी सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करणार
10. कानपूर कसोटी रोमांचक स्थितीत, भारताकडे 63 धावांची आघाडी, न्यूझीलंडचा पहिला डाव 296 धावांवर आटोपला