दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो. 


1. जगभरात वेगानं पसरणाऱ्या ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक, शाळांबाबतच्या निर्णयाकडे लक्ष, 13 देशांतून येणाऱ्यांना क्वारंटाईन करणार 


2. मुंबईलगतच्या डोंबिवलीत दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्याला कोरोनाची लागण, ओमिक्रॉनची लागण झाली की नाही यासाठी जिनोम सिक्वेन्सिंग चाचणी, अहवालाची प्रतीक्षा


3.  शाळांबाबत आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी; मास्क, सोशल डिस्टन्सिंग सह अन्य पालन करावं लागणार


आरोग्य विभागाच्या आरोग्यसेवा संचालनालयाकडून शाळा सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. शिक्षण विभागाच्या शाळा सुरु करण्याबाबतच्या शासन निर्णय व त्यातील मार्गदर्शक सूचनांची आता प्रतीक्षा आहे. येत्या 1 डिसेंबर पासून राज्यभरातील पहिली ते सातवीच्या शाळा सुरु करण्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून जिल्हापरिषद, महापालिका स्तरावर मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.या मार्गदर्शक सूचना जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सक, महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मुंबई महापालिकेचे कार्यकारी आरोग्य अधिकारी यांना पाठवण्यात आल्या आहेत. या सूचनांचे काटेकोरपणे पालन राज्यातील सर्व शाळांनी करायचा आहे.


4.  ओमिक्रॉन व्हेरियंटचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्राचं मोठं पाऊल, धोकादायक श्रेणीतील 12 देशांची यादी केंद्र सरकारकडून जाहीर


 5 . हिवाळी अधिवेशनात क्रिप्टोकरन्सीसह 26 विधेयकं मंजूर करून घेण्याचं सरकारसमोर आव्हान, विरोधक हमीभाव कायदा आणि मंत्री अजय मिश्रांचा राजीनाम्यासाठी आक्रमक



6. भिवंडीत लग्न सुरु असतानाच आगीचा भडका, फटाक्यांमुळं लागलेल्या आगीत अनेक वाहनांचा कोळसा, उशीरा रात्री आगीवर नियंत्रण
 
7. मुंबई विमानतळावर साडेतीन हजार आयफोन- 13 जप्त, 42 कोटींचा मुद्देमाल हस्तगत, डीआरआयची मोठी कारवाई
 
8. सिंधुदुर्गात पट्टेरी वाघाचं दर्शन, शिकार करताना वाघोबा वन विभागाच्या कॅमेऱ्यात  कैद, कोकणातले जंगल वाघांच्या अधिवासासाठी अनुकुल असल्याची वन्यप्रेमींमध्ये चर्चा


9. निवडणुकीत रिस्क नको! घोडेबाजार टाळण्यासाठी नागपूरचे भाजप नगरसेवक गोवा टूरवर 


10. कानपूर कसोटीत आज शेवटच्या दिवशी रोमांच, टीम इंडियाला विजयासाठी 9 विकेट्सची गरज, गोलंदाजाच्या कामगिरीवर भिस्त