1. गडचिरोलीत नक्षलींनी घडवलेल्या स्फोटात 15 जवानांसह चालक शहीद, महाराष्ट्रावर शोककळा तर नेत्यांकडून राजकारणाला ऊत, शहीदांना मानवंदना देण्यासाठी मुख्यमंत्री गडचिरोलीत

    2. द्वेषामुळे काँग्रेसला माझ्या हत्येचं स्वप्न पडतंय, मध्य प्रदेशातल्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं खळबळजनक वक्तव्य

    3. जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर अखेर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित, चीनने टेक्निकल होल्ड हटवला, पाकिस्तानकडे मसूदच्या अटकेशिवाय पर्याय नाही

    4. "ही तर सुरुवात आहे, पुढे बघा काय काय होतं", मसूद अझहरप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया

    5. बुरखाबंदी ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची भूमिका असल्यानं त्यावर ठाम, सामनातील आग्रलेखावर खासदार संजय राऊत कायम, तर बुरखाबंदी शिवसेनेची भूमिका नसल्याचे नीलम गोऱ्हेंचे स्पष्टीकरण






  1. बारामती लोकसभा भाजपने जिंकल्यास लोकांचा निवडणुकांवरचा विश्वास उडेल, 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचं विधान, तर पवारांना पराभवाची चाहूल लागल्याचा भाजपचा टोला

  2. बेताल विधानांचा सपाटा लावणाऱ्या साध्वी प्रज्ञा ठाकूरची बोलती बंद, 3 दिवसांसाठी प्रचारबंदी, बाबरी मशिदीसंदर्भात केलेल्या वक्तव्याप्रकरणी निवडणूक आयोगाची कारवाई

  3. ओदिशातल्या पुरीमध्ये 180 किमी प्रतितास वेगाने फनी वादळ धडकणार, संकटाशी दोन हात करण्यासाठी प्रशासन सज्ज

  4. घरगुती विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किमतीत 6 रुपयांची वाढ, तर अनुदानित सिलेंडर 29 पैशांनी महाग

  5. चेन्नई सुपर किंग्सकडून दिल्ली कॅपिटल्सचा 80 धावांनी धुव्वा, चेन्नईची गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप