1. लक्षणं असतील आणि कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आला तरीही क्वॉरंटाईन व्हा, घरातही मास्क वापरा, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा इशारा
2. राज्यात लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढवण्याची शक्यता, रुग्णसंख्या नियंत्रणात येत असली तरीही आरोग्य सुविधांच्या दृष्टीनं कालावधी वाढण्याची शक्यता
3. राज्यातील कोरोना रुग्णआलेख स्थिरतेकडे जात असल्याचे संकेत, मुंबई ठाण्यात रुग्णसंख्येत घट, पुणे- नागपूरमध्येही रुग्णसंख्या स्थिर
4. मुंबईकरांसाठी गुडन्यूज, कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश, रुग्ण दुपटीचा कालावधी 55 दिवसांवर, कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही जास्त
5. लसीकरणाच्या प्रतिक्षेत असणाऱ्यांसाठी चांगली बातमी, मुंबईतील सर्व लसीकरण केंद्र सुरळीत सुरु, कोविशील्ड लसीचा नव्यानं पुरवठा,
6. सरसकट मोफत लसीकरणावरुन ठाकरे सरकारमध्ये मतभिन्नता, राज्यात मोफत लसीकरणाचा निर्णय होणार का, याकडेच साऱ्यांचं लक्ष
7. केंद्राकडून राज्यांना मोफत लस मिळणार असल्यामुळं राज्यांवर लसींचा मोठा भार नसेल, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची माहिती
8. कर्नाटकात 14 दिवसांचा लॉकडाऊन, वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
9. कोरोना काळात निवडणुकीचं आयोजन करणाऱ्या आयोगावरच हत्येचा गुन्हा नोंदवला पाहिजे, मद्रास उच्च न्यायालयाची गंभीर टीप्पणी
10. सनदी अधिकारी रश्मी शुक्ला यांना मुंबई सायबर पोलिसांचे समन्स; फोन टॅपिंग प्रकरणी सायबर सेल रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवणार