1. महाराष्ट्राला मोठा दिलासा, राज्यातील एका दिवसातील कोरोना रुग्णांचा आकडा 25 हजारांहून कमी, रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 92 टक्क्यांवर 


2. कोरोनानंतर राज्यात म्युकरमायकोसिसचा वाढता धोका, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलावली महत्त्वाची बैठक 


3. लसींचा साठा शिल्लक नसल्यानं पुण्यात आज लसीकरण बंद, मुंबईत आजपासून स्तनदा माता आणि गर्भवती महिलांचं लसीकरण


4. रशियन बनावटीच्या स्फुटनिक व्ही या लसीच्या भारतातील उत्पादनास सुरुवात, चाचणीसाठी लसीची पहिली बॅच रशियाला पाठवणार 


5. लस पुरवठ्यासाठी मुंबई महापालिकेची रशियाला विनंती, ग्लोबल टेंडरमागोमाग घेतला आणखी एक महत्त्वाचा निर्णय 


6. लसींची खरेदी केंद्रानं करावी आणि वितरण राज्यांनी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा केंद्र सरकारला सल्ला 


7. 18 वर्षांवरील लसीकरणासाठी कोविन अॅप नोंदणीविनाच लस घेता येणार, शासकीय केंद्रांसाठी नियम लागू, खासगी केंद्रांसाठी मात्र नोंदणी आवश्यक 


8. माझ्या राजीनाम्याने मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार असेल, तर मी उद्याच राजीनामा देतो, खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्विग्न प्रतिक्रिया  


9. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र वाढवण्यासाठी लगतच्या गावांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव सादर करा; मुख्यमंत्र्यांचा आदेश 


10. आक्षेपार्ह दृश्यांमुळे 'द फॅमिली मॅन 2' वादाच्या भोवऱ्यात, तामिळनाडू सरकारकडूनही शो वर बंदी आणण्याची मागणी