2. राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून, तर मोदी सरकार 2 चं संसदीय अधिवेशनही आज सुरु होणार, 'वन नेशन, वन इलेक्शन'वर चर्चा होण्याची शक्यता,
3. संसदेचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, विरोधी पक्षाकडून शेतकरी, बेरोजगारी, दुष्काळाच्या मुद्द्यांवर चर्चेची मागणी
4. राज्यमंत्रिमंडळ विस्तारात राधाकृष्ण विखेंकडे गृहनिर्माण मंत्रिपदाची धुरा, अनिल बोंडेंच्या खांद्यावर कृषी मंत्रालयाचा भार, तर राम शिंदेंचं जलसंधारण शिवसेनेच्या तानाजी सावंतांकडे
5. विनोद तावडेंचं खातं विभागून आशिष शेलारांकडे शालेय शिक्षणाची जबाबदारी, तर चंद्रकांत पाटलांच्या खात्यांमध्येही कपात
6. विस्तारावर टोला हाणताना एकनाथ खडसेंचं पक्षबदलू विखेंकडे बोट, मंत्रिपदाचा उत्साह राहिला नसल्याची प्रतिक्रिया
7. विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदावरुन काँग्रेसमध्ये चढाओढ, बैठकीत बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवारांमध्ये जुंपल्याची सूत्रांची माहिती
8. राम मंदिर उभारण्याची हिंमत मोदी सरकारमध्येच, अयोध्या दौऱ्यात उद्धव ठाकरेंचा नवा सूर, 18 शिवसेना खासदारांसह रामलल्लांचं दर्शन
9. राज्यात एमबीबीएसच्या जागा वाढणार, गिरीश महाजन केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या भेटीला, सात नवीन वैद्यकीय शासकीय महाविद्यालयांनाही केंद्र सरकारची मंजुरी
10. डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनकडून देशव्यापी संपाची हाक, राज्यातील क्लिनीक, रुग्णालयं, सिटी स्कॅन सेंटर्स राहणार बंद