1. महाराष्ट्रासह केरळ, तामिळनाडू, केरळ, गुजरातला तोक्ते चक्रीवादळाचा धोका, हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा
2. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गोव्यासह महाराष्ट्रातील काही भागांत सोसाट्याचे वारे आणि पावसाच्या सरी, मुंबईतही पावसाचा शिडकावा
3. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सज्ज राहून मनुष्यबळ, साधनसामुग्री तयार ठेवा; मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनाला सूचना
4. . यंदा मान्सून केरळमध्ये एकदिवस आधी दाखल होणार, 31 मे रोजी मान्सून केरळ किनारपट्टीवर धडकणार, हवामान विभागाची माहिती
5. राज्यात शुक्रवारी 53,249 रुग्ण बरे होऊन घरी तर 39,923 नवीन रुग्णांचे निदान, काही दिवसांपासून नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त
6. ग्रामीण आणि आदिवासी बहुल भागांत कोरोना लसीकरणाच्या जनजागृतीची गरज, स्मार्टफोनअभावी लसीकरण नोंदणीत अडचणी
7. राज्यात 15 आणि 16 मे रोजी लसीकरण नाही, कोविन अॅप अपडेशनसाठी बंद, प्रशासनाकडून सूचना
8. यावर्षी भारतात 85 कोटींहून अधिक स्पुटनिक-V लसीच्या डोसचे उत्पादन होणार, रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडची माहिती
9. पदोन्नतीतील आरक्षण रद्द करणाऱ्या शासन निर्णयाविरुद्ध काँग्रेस आंदोलन छेडणार, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा इशारा
10. ऑक्सिजन टॅंकर्स वेळेत पोहोचवण्यासाठी कंट्रोल रुमची स्थापना, ऑक्सिजन टॅंकर्सवर असणार RTOची नजर