1. लातूरच्या औसामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर,तब्बल अडीच वर्षांनी एकाच व्यासपीठावर,उद्धव यांची राजनाथ सिंहांशी फोनवरही चर्चा
 
  1. भाजपमधील दुर्लक्षित ज्येष्ठांची पक्षाध्यक्षांकडून मनधरणी,लालकृष्ण अडवाणी,मुरली मनोहर जोशींची अमित शाहांकडून भेट
 
  1. पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार,गुरुवारी विदर्भातील सात मतदारसंघांमध्ये मतदान,तर चौथ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
 
  1. भाजपचा पुन्हा राम मंदिराचा नारा,साठीनंतर शेतकरी-दुकानदारांना पेन्शन,तर बळीराजाला सरसकट 6 हजाराचं अनुदान, लोकसभेसाठी भाजपचं 75 कलमी संकल्पपत्र
 
  1. राष्ट्रवादीने जातीयवादाचं विष पेरलं, 'माझा'ला दिलेल्या सनसनाटी मुलाखतीत मुख्यमंत्र्यांचा घणाघात,मनसे म्हणजे उमेदवार नसलेली सेना झाल्याचीही टीका
  1. बारामतीतून सुप्रिया सुळेंचा पराभव निश्चित,मताधिक्याबाबत उत्सुकता,सांगलीतील सभेत चंद्रकांत पाटलांचा दावा, पवारांवरही टीकास्त्र
 
  1. कोल्हापुरात माजी उपमहापौराच्या पतीच्या मटका अड्ड्यावर छापा,जमावाचा पोलिसांवरच हल्ला,महिला आयपीएसवर पिस्तुल रोखली
 
  1. देशभरातल्या सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या यादीत पुणे विद्यापीठ नवव्या स्थानावर,तर मुंबई विद्यापीठ 81 व्या स्थानी,मानव संसाधन विकास मंत्रालयाची क्रमवारी
 
  1. विंग कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानचं एफ-16 विमान पाडतानाचा क्षण रडारमध्ये रेकॉर्ड,पुरावे मागणाऱ्या पाकिस्तानला भारतीय वायुसेनेची सणसणीत चपराक
 
  1. महाराष्ट्राच्या सिद्धार्थ देसाईला प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमात सर्वात मोठी बोली,कोल्हापूरच्या शिलेदाराला तेलगू टायटन्सकडून एक कोटी 45 लाखांची किंमत