2. नागपुरात थोड्याच वेळात आरएसएसचा विजयादशमी सोहळा, सरसंघचालक मोहन भागवत भाषण करणार तर धम्मचक्र प्रर्वतन दिनानिमित्त नागपुरातील दीक्षा भूमीवर कार्यक्रम
3. महायुतीत लहान भाऊ ठरल्यानंतर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे लक्ष, तर सावरगावमध्ये पंकजा मुंडेंच्या मेळाव्यात अमित शाहांची तोफ धडाडणार
4. विरोधक संपवण्यासाठी फोन टॅपिंगचा वापर, तर मुख्यमंत्री प्रांतवादी आहेत, एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांचा आरोप
5. खडसे, रावल, गोरे, पाचपुते यांच्यासमोर बंडखोरांचं आव्हान कायम, सिंधुदुर्गात तिन्ही मतदारसंघात युती खुंटीला, अशोक चव्हाण, प्रणिती शिंदेंना दिलासा
6. वायुदलाचा आज 87 वा स्थापना दिवस, आज पहिलं राफेल विमान भारताला मिळणार, फ्रान्समध्ये संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते शस्त्रपूजन
7. पदवीपर्यंत मोफत शिक्षण, शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि भूमिपूत्रांना रोजगारातल्या आरक्षणाचं आघाडीकडून आश्वासन, विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध
8. भाजपनं धोका दिला, जागांचं आश्वासन पाळलं नसल्याचा आरोप करत महादेव जानकरांची खदखद, भाजपनं पळवलेले बोर्डिकर आणि कांचन कुल रासपमधून बेदखल
9. स्विस बँकेतल्या खातेदारांची पहिली यादी भारत सरकारच्या हाती, 75 देशातल्या 31 लाख खातेदारांचं गुपित स्वित्झर्लंडकडून उघड
10. सौदी अरेबियाच्या प्रिन्सकडून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा अपमान, अर्ध्यातून विमान परत बोलावलं