1. विधानसभेचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस, प्रचार सोडून मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंचा बंडोबांशी फोनवरुन संवाद, भाजपसमोर 27 मतदारसंघात 144 बंडखोरांचं आव्हान
 
  1. परतीचा पाऊसही महाराष्ट्राला झोडपणार, 7 ते 12 ऑक्टोबरदरम्यानच्या प्रचारावर वादळी पावसाचं सावट, काही तासांच्या पावसामुळं नाशकात पाणीच पाणी
  1. आरे प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, वृक्षतोड तात्काळ थांबवण्यासाठी विद्यार्थ्यांचं पत्र, सरन्यायाधीशांकडून विशेष दाखल
 
  1. राज ठाकरेंच्या पहिल्यावहिल्या सभेसाठी पुण्यात मैदान मिळेना, सभेच्या जागेसाठी मनसेचे शर्थीचे प्रयत्न, अलका चौकात सभा घेण्याचा मनसेचा इशारा
 
  1. पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात नऊ सभा घेणार, 17 ऑक्टोबरला पुणे-साताऱ्यात सभा
 
  1. नोकरी-धंद्याची स्थिती आणखी बिकट होण्याची भारतीयांना भीती, आरबीआयच्या सर्वेक्षणादरम्यान नोंदवलं मतं, तर पुढच्या वर्षी स्थिती सुधारण्याची अनेकांना आशा
 
  1. महात्मा गांधींच्या अस्थी चोरुन फोटोखाली 'गद्दार' लिहिले, तुषार गांधींना अश्रू अनावर
 
  1. शुटिंग दरम्यान अपघात झालेल्या सहकलाकाराचा जीव वाचवण्यासाठी अक्षय कुमारची धाव, मनिष पॉल शो दरम्यानची दृश्य व्हायरल
 
  1. भुसावळमध्ये अंधाधुंद गोळीबारात पाच जणांची हत्या, भाजप नगरसेवक रविंद्र खरात यांच्या परिवारावर अज्ञातांचा गोळीबार, तीन संशयित ताब्यात
 
  1. टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेवर 203 धावांनी दणदणीत विजय, शमी, जाडेजाची शानदार गोलंदाजी