- 125 उमेदवारांची भाजपची पहिली यादी जाहीर, खडसे, तावडे वेटिंगवर, आज दुसरी यादी जाहीर होणार
- स्वतःकडे 164 जागा ठेवताना भाजपनं शिवसेनेला 124 जागा सोडल्या, पुणे, नाशिक, नवी मुंबई, नागपुरात सेनेला भोपळा, मित्रपक्षांच्या जागांचा सस्पेन्स कायम
- उमेदवारी न मिळाल्यानं मुंबई, सातारा, नागपूर, परभणी, नांदेडसह ठिकठिकाणी बंडाळी, कार्यकर्त्यांच्या रोषाचा सामना करताना दरेकरांचा संताप अनावर
- विधानसभेसाठी 52 उमेदवारांची काँग्रेसची उमेदवारी जाहीर, कराडमधून पृथ्वीराज चव्हाण, लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुखांना उमेदवारी
- विधानसभेसाठी मनसेची पहिली यादी, 27 जणांच्या नावावर शिक्कामोर्तब, मुंबई, ठाणे आणि नाशकातले उमेदवार जाहीर, वरळीतून अद्याप उमेदवार नाही
- नितेश राणे यांचं भाजपच्या यादीत नाव पक्कं, आज नाव जाहीर होणार, कणकवली देवगडमधून नितेश राणे यांना उमेदवारी
- कल्याणमध्ये भाजपचं सामूहिक 'राजीनामास्त्र!', शिवसेनेला जागा सोडल्यानं मोठी नाराजी
- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अर्थ फक्त 'रिमांड बॅक', माहिती लपवल्याप्रकरणी 'खटल्या'च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर मुख्यमंत्री कार्यालयाचे स्पष्टीकरण
- मशाल महोत्सवानिमित्तं प्रतापगड उजळला, यंदा 359 मशाली पेटवल्या, गडावर फटाक्यांचीही आतषबाजी
- राष्ट्रपिता महात्मा गांधींची आज 150वी जयंती, दिग्गजांकडून गांधींजींना आदरांजली तर देशभरात स्वच्छता अभियानाद्वारे श्रद्धांजली अर्पण करणार