मुंबई : पश्चिम महाराष्ट्रात येत्या चार तासात पावसाची शक्यता आहे. स्कायमेटने हा अंदाज  वर्तवला आहे.

सांगली, सातारा आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांमध्ये येत्या चार तासात पावसाची शक्यता आहे.  

https://twitter.com/SkymetWeather/status/858255924347248640

दरम्यान, सांगली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचं वातावरण आहे. सांगलीतील काही भागात आज गारांसह पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे लोकांची मोठी तारांबळ उडाली.

संबंधित बातमी :  राज्यात यंदा सर्वसाधारण पाऊस, भेंडवडची भविष्यवाणी